ऊसाच्या मळ्यात आढळली वाघाटीची पिल्ले

132

कोल्हापुरात शनिवारी सकाळी कागल तालुक्यातील गोरंबे गावातील ऊसाच्या मळ्यात वाघाटीची पिल्ले आढळून आली होती. पिल्लांना आईशी भेट घडवून देण्यासाठी दोनदा प्रयत्न करुनही आई पिल्लांना घेऊन जात नव्हती, अखेरीस मंगळवारी पहाटे आई आणि पिल्लांचे मिलन घडवण्यात वनाधिकारी यशस्वी झाले.

काय घडला प्रकार?

शनिवारी कोल्हापुरात समाजमाध्यमांवर वाघाटीची छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. तपासाअंती गोरंबे गावातील शेतातील हा व्हिडिओ असल्याचे वनाधिका-यांना समजले. स्थानिकांना प्राण्याची ओळख नसल्याने परिसरामध्ये घबराहटीचे वातावरण होते. घटनास्थळी धाव घेत वनाधिका-यांनी वाघाटीच्या तीन पिल्लांना ताब्यात घेतले. अंदाजे महिन्याभराच्या तीन पिल्लांजवळ घटनास्थळी आई नसल्याचे वनाधिका-यांच्या लक्षात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता शारीरिकदृष्ट्या ते सक्षम असल्याने वनाधिका-यांना समजले. शनिवारी रात्रीच पिल्लांची आणि आईची ऊसाच्या मळ्यात मिलन घडवण्याचा निर्णय वनाधिका-यांनी घेतला.

(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)

दोन प्रयत्न अयशस्वी

शनिवारी रात्री तसेच रविवारी रात्री असे दोनदा ऊसाच्या मळ्यात पिल्लांना आईशी भेट घडवून देण्याचा वनाधिका-यांनी प्रयत्न केला. मात्र आई ऊसाच्या मळ्यात येऊनही पिल्लांजवळ येत नव्हती. ती जवळच्या बांध्यावर येऊन बसायची, परंतु पिल्लांना घेऊन जात नव्हती. अखेरिस मंगळवारी पहाटे चार वाजता आई पिल्लांजवळ आली आणि तिन्ही पिल्लांना एकामागून एक घेऊन गेली, अशी माहिती कोल्हापूर वनविभाग (प्रादेशिक)चे गुरुप्रसाद यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.