S Jaishankar : पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर रिकामा करून देणे हाच उपाय; भारताने सुनावले खडे बोल

50
S Jaishankar : पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर रिकामा करून देणे हाच उपाय; भारताने सुनावले खडे बोल
S Jaishankar : पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर रिकामा करून देणे हाच उपाय; भारताने सुनावले खडे बोल

पाकिस्तानचा सीमेपलीकडील दहशतवाद कधीही यशस्वी होणार नाही. त्यांच्या कृत्याचे परिणाम शेजारील देशाला भोगावे लागतील. पाकिस्तानद्वारे अवैधरित्या कब्जा करण्यात आलेले भारतीय क्षेत्र, म्हणजेच पाकव्याप्त (POK) रिकामा करून देणे हे आमच्यातील समस्येवर तोडगा आहे, असे खडे बोल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी सुनावले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) आमसभेत एस जयशंकर बोलत होते. एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.

(हेही वाचा – Whale’s vomit : ६ कोटी २० लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त! तिघांना अटक, आरोपी उलटीचं काय करतात?)

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीरमधील स्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. एस जयशंकर म्हणाले की, या देशाने त्यांच्या कर्मामुळे जागतिक व्यवस्थेत मागे रहाण्याचा मार्ग निवडला आहे. अनेक देश परिस्थितीमुळे मागे रहातात; परंतु काही देश जाणुनबुजून असे निर्णय घेतात ज्याचे परिणाम खूप भयानक असतात. आमच्या शेजारील पाकिस्तान हा यातील प्रमुख उदाहरण आहे. पाकिस्तान नेहमी दुसऱ्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो, तीच स्थिती आज पाकिस्तान गिळंकृत करण्यासाठी तयार आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्याच समाजाचे नुकसान करत आहेत. ते जगाला दोष देऊ शकत नाही. हे फक्त कर्माचे फळ आहे.

त्यांचा जीडीपी दहशतवादाच्या रूपात मोजा

तसेच दुर्दैवाने त्यांच्या गैरकृत्यांचा इतरांवर परिणाम होतो, विशेषत: शेजाऱ्यांवर..जेव्हा राजकारणात आपल्या लोकांमध्ये कट्टरता असते, तेव्हा त्यांचा जीडीपी केवळ कट्टरपंथ आणि दहशतवादाच्या रूपात मोजला जाऊ शकतो. इतरांच्या जमिनीच्या लालसेपोटी कृत्य करणाऱ्या एका निष्क्रीय राष्ट्राचा पर्दाफाश आणि सामना केला पाहिजे, असेही एस जयशंकर (S Jaishankar) म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते शहाबाज शरीफ ?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी यूएनजीएच्या सभेत त्यांच्या भाषणात जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. ते म्हणाले होते की, लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतके संघर्ष केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांची इच्छा यावर चर्चा व्हाबी. भारताने परस्पर सामरिक संयम व्यवस्थेचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला आहे. भारतीय नेतृत्वाने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडण्याची धमकी दिल्याचा आरोप शहाबाज शरीफ यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.