भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय जगातील कोणताही मोठा मुद्दा निकाली निघत नाही, असे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नागपूर येथे केले. आपण बदललो आहोत आणि आपल्याबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. परराष्ट्रमंत्री (Minister of Foreign Affairs) डॉ. एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी नागपूर येथील स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, परमपूज्य डॉ. के. बी. हेडगेवार आणि परमपूज्य गुरुजींना श्रद्धांजली वाहिली.
(हेही वाचा – David Warner : ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर जेव्हा सामन्यासाठी हेलिकॉप्टरमधून थेट मैदानात उतरला)
लाल समुद्रातील हल्ल्यांमुळे वाढली चिंता
हुथी बंडखोरांनी (Houthi rebels) लाल समुद्रात (red sea) व्यापारी जहाजांवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांमुळे भारताची चिंता वाढली होती. भारतासाठी, लाल समुद्र मार्ग हा सर्वांत विश्वासार्ह निर्यात मार्गांपैकी एक आहे; कारण तो भारताला युरोप, अमेरिकेची पूर्व किनारपट्टी, मध्य-पूर्व आणि आफ्रिकन देशांशी जोडतो. हल्ल्याच्या वाढत्या भीतीमुळे निर्यातदारांनी मालवाहतूक थांबवली. त्यामुळे भारताच्या निर्यातीत 30 अब्ज डॉलर्सची घट होण्याची शक्यता आहे.
जयशंकर आणि ब्लिंकन यांच्यात चर्चा
या प्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी लाल समुद्रातील आव्हानात्मक सुरक्षा परिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. 2024 साठी आमचा सर्वसमावेशक सहकार्याचा अजेंडा साकार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जयशंकर आणि ब्लिंकन यांनी दोन्ही नेत्यांमधील दूरध्वनी संभाषणादरम्यान इस्रायल-हमास संघर्ष (Israel-Hamas conflict) आणि युक्रेनमधील (Ukraine) परिस्थितीवर चर्चा केली.
(हेही वाचा – Indigo Bumper 2023 : २०२३ मध्ये इंडिगो एअरलाईन्समधून १०० दशलक्ष प्रवाशांनी केला प्रवास)
A good discussion this evening with my friend US @SecBlinken.
Our conversation focused on maritime security challenges, especially the Red Sea region. Appreciated his insights on ongoing situation in West Asia, including Gaza.
Exchanged perspectives on developments pertaining…
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 11, 2024
लाल समुद्रातील आव्हाने केंद्रस्थानी
“परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “आज संध्याकाळी माझे मित्र आणि अमेरिकेचे (America) परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांच्याशी चांगली चर्चा झाली.” आमची चर्चा सागरी सुरक्षा आव्हानांवर, विशेषतः लाल समुद्र प्रदेशातील आव्हानांवर केंद्रित होती. त्याच वेळी गाझासह पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अमेरिकेच्या धोरणांचे कौतुक करण्यात आले. (S. Jaishankar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community