S Jaishankar On China : शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात; एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले खडे बोल

S Jaishankar On China : 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. गलवान चकमकीत 38 चिनी सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले. चीनने केवळ 4 जणांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते.

210
S Jaishankar On China : शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात; एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले खडे बोल
S Jaishankar On China : शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात; एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले खडे बोल

अनेक मुद्द्यांवर भारत-चीन एकमत नाही. शेजारी लिखित करारांचे उल्लंघन करतात, तेव्हा ही चिंतेची बाब आहे. यामुळे त्यांच्या संबंधांच्या स्थिरतेवर प्रश्न निर्माण होतात, असे खडे बोल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी सुनावले आहेत. या भाषणात जयशंकर यांनी चीनने सीमेवर रक्तपात आणि लिखित करारांचे उल्लंघन केल्याचा उल्लेख केला आहे. ते गुरुवार, ७ मार्च रोजी जपानची राजधानी टोकियो येथे रायसिना गोलमेज परिषदेत बोलत होते. (S Jaishankar On China)

(हेही वाचा – LPG Cylinder : एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदान एका वर्षासाठी वाढवले)

गलवान संघर्षानंतर सर्व काही बदलले

जयशंकर पुढे म्हणाले की, 2020 मध्ये एप्रिल-मेमध्ये चीनने पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात सरावाच्या निमित्ताने सैन्य तैनात केले होते. यानंतर अनेक ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या. भारत सरकारनेही या भागात चीनइतकेच सैन्य तैनात केले होते. 1975 ते 2020 या काळात सीमेवर शांतता होती. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर (Galwan Clash) सर्व काही बदलले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, 4 दशकांहून अधिक काळ एलएसीवर गोळ्या झाडल्या गेल्या. दरम्यान, 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. गलवान चकमकीत 38 चिनी सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले. चीनने केवळ 4 जणांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते.

संघर्षामुळे जगभरातील नेते सतर्क झाले

गलवानमधील दोन अणुशक्ती असलेल्या देशांमधील संघर्षामुळे जगभरातील नेते सतर्क झाले. यानंतरच, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांच्यात निर्माण झालेली सिक्योरिटी अलायंस क्वाड त्वरित मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

चीनमुळे वाढत्या सुरक्षेच्या चिंता सामायिक करण्यासाठी मार्च 2021 मध्ये चार देशांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठीच क्वाडची स्थापना करण्यात आली आहे. (S Jaishankar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.