परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (United Nations General Assembly) ७९ व्या सर्वसाधारण चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी युक्रेन आणि गाझा युद्धात सुरू असलेल्या युद्धाविरोधात जागतिक समुदायाला इशारा दिला. UNGA कार्यक्रमात जयशंकर यांनी जागतिक समुदायाला जगभरात सुरू असलेल्या संघर्षांवर त्वरित उपाय शोधण्याचे आवाहन केले. (S Jaishankar)
जयशंकर म्हणाले की, युक्रेन असो वा गाझा, जागतिक समुदायाला त्यावर तोडगा हवा आहे. जगभर संघर्ष सुरू असताना आपण येथे जमलो आहोत. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा जग अद्याप कोविडमधून (Covid-19) सावरले नव्हते. युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध तिसऱ्या वर्षात आहे. गाझामध्येही (Gaza) भीषण संघर्ष सुरू आहे. शांतता आणि विकास एकमेकांना पूरक असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने नेहमीच म्हटले आहे.
(हेही वाचा – MP Afzal Ansari यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, ऋषी- मुनी मठांमध्ये गांजा ओढतात…)
ग्लोबल साउथमधील विकास प्रकल्प रुळावरून घसरल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत खंत व्यक्त केली. ग्लोबल साउथ विकास उद्दिष्टे मागे पडत आहे. चीनवर निशाणा साधत जयशंकर म्हणाले की, भेदभावपूर्ण व्यापार पद्धतींमुळे रोजगाराला धोका निर्माण होतो.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community