Statue: सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वानखेडे स्टेडियमवर अनावरण

हा पुतळा उभारण्यासाठी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी पुढाकार घेतला आहे.

110
Statue: सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वानखेडे स्टेडियमवर अनावरण
Statue: सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वानखेडे स्टेडियमवर अनावरण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Statue) अनावरण बुधवारी, (१ नोव्हेंबर) रोजी वानखेडे स्टेडियमवर केले जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेअंतर्गत वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium ) २ नोव्हेंबरला भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी बीसीसीआय सचिव जय शहा आणि कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असून सचिनसह दिग्गज आजी-माजी खेळाडूंची उपस्थितीही या कार्यक्रमाला लाभणार आहे.

(हेही वाचा – Happy Birthday ऐश्वर्या ! मॉडेलिंग आणि अभिनयाचा यशस्वी प्रवास…वाचा सविस्तर )

सचिनचा २२ फुटांचा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद काळे (Sculptor Pramod Kale) यांनी बनवला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी पुढाकार घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.