Sachin Vaze Case : सचिन वाझेला अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करायची होती, एनआयए न्यायालयाने नोंदवली महत्त्वाची निरीक्षणे

129

मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze Case)अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करायची होती, असं निरीक्षण एनआयए न्यायालयाने नोंदवलं आहे. मनसुख हिरेन हत्या आणि अँटेलिया बंगल्याबाहेर स्फोटकं ठेवल्याबाबत सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने निरीक्षणांची नोंद केली असल्याचं वृत्त  पीटीआयने प्रसिद्ध केलं आहे.

(हेही वाचा – Pune E Bus : सोलापूर-पुणे मार्गावर शिवाई ई-बस धावणार)

या प्रकरणाबाबत विशेष एनआयए न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आरोपी सचिन वाझेचा १६ सप्टेंबरला जामीन नाकारला. याप्रकरणी शुक्रवारी, २२ सप्टेंबरला सविस्तर आदेश उपलब्ध झाला. यात काही गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये जिलेटिन कांड्या डिटोनेटरला जोडलेल्या नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी, ती कृती लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी पुरेशी असून या प्रकरणात आरोपीला अंबानी कुटुंबियांच्या मनात दहशत निर्माण करायची होती, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.