भिवंडीच्या ‘त्या’ साठ्यातून सचिन वाझेने घेतली स्फोटके? 

पोलिस सचिन वाझे याला पुरवण्यात आलेले जिलेटीन हे ठाणे जिल्ह्यातून पुरवण्यात आल्याचे एनआयएच्या चौकशीत समोर आले होते.

65
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन कांड्या भरलेली स्कॉर्पिओ कार उभी केली होती. त्याचा १८ मे रोजी भिवंडी येथून जप्त करण्यात आलेल्या १२ हजार जिलेटीन कांड्याच्या साठ्याशी कनेक्शन आहे का, हे तपासण्यात येत आहे. पोलिस आता भिवंडीत सापडलेल्या जिलेटीन कांड्या आणि डेटोनेटर यांचे ऑडिट करून अहवाल तयार करणार आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

स्फोटके बेकायदेशीर ठेवली होती!

भिवंडी तालुक्यात असणाऱ्या कारवली या ठिकाणी असलेल्या मित्तल एंटरप्राइजेसच्या कार्यालयाच्या स्टोर रूममध्ये सोमवारी रात्री ठाणे गुन्हे शाखेने छापा टाकून डेक्कन कंपनीचे १२ हजार जिलेटीन कांड्या आणि ३००८ सोलर आणि डेक्कन कंपनीचे डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत. गुरुनाथ म्हात्रे (५३) याला अटक करण्यात आली असून त्याला स्थानिक न्यायालयाने 22 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या जिलेटीन कांड्या आणि डेटोनेटर खदानीसाठी मागवण्यात आले होते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात  मागवण्यात आलेल्या जिलेटीन आणि डेटोनेटरचा साठा हा बेकायदेशीरपणे करण्यात आला होता.

 

सचिन वाझेचे भिवंडी कनेक्शन!

या जिलेटीन आणि  डेटोनेटरचा वापर आणखी कुठे करण्यात आला आहे का, याची माहिती मागवण्यात येत आहे. तसेच बडतर्फ पोलिस सचिन वाझे याला पुरवण्यात आलेले जिलेटीन हे ठाणे जिल्ह्यातून पुरवण्यात आल्याचे एनआयएच्या चौकशीत समोर आले होते. सचिन वाझेला जिलेटीन कांड्या  भिवंडीत मिळालेल्या जिलेटीन साठ्यापैकी नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.