Sadanand Date: मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दाते हे सध्या केंद्रीय तपास यंत्रणा ‘राष्ट्रीय तपास संस्था’ (NIA)चे महासंचालक आहेत. मात्र सदानंद दाते यांच्याकडे २६/११ मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा (Tahavur Rana) यांचा तपास करण्याची जवाबदारी असल्यामुळे केंद्र सरकार त्यांना या जवाबदारीतुन मुक्त करतील का यावर सर्व अवलंबून असेल असे काही आयपीएस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. (Sadanand Date)
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहे. फणसळकर यांच्या निवृत्ती नंतर रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) हे आयुक्तपदासाठी दावेकरी असले तरी त्यांच्या पेक्षा वरिष्ठ आईपीएस अधिकारी आयुक्तपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्या पाठोपाठ मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजयकुमार वर्मा, संजय कुमार सिंघल, रितेश कुमार आणि अमिताभ गुप्ता यांच्या नावाची चर्चा सुरू असताना अचानक वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
(हेही वाचा – मुलींच्या सुरक्षेसाठी समाजाने सजग होणं गरजेचं; Dr. Neelam Gorhe यांचे आवाहन)
हेही पहा –