शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अखेर ईडीने अटक केली. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे.
उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचेही नाव जोडण्यात आले होते.
(हेही वाचा उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत होते, तेवढ्यात अजित पवारांनी मारला डोळा! पहा व्हायरल व्हिडिओ)