ओला-उबेरपेक्षा स्वस्त ‘सहकार टॅक्सी’ सेवा सुरू होणार! १० लाख नागरिकांना रोजगाराची संधी

तुम्ही बाहेर जाताना ओला (Ola) किंवा उबेरने (Uber) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून तुम्ही ओला-उबेरपेक्षा कमी दरात या सहकार टॅक्सीतून प्रवास करू शकता. नॅशनल टूरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड (NFTC) लवकरच नवीन परिवहन सेवा ‘सहकार टॅक्सी’ सुरू करणार आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून कुरिअर सेवाही सुरू 

‘सहकार टॅक्सी’ सेवा ओला आणि उबेर सारखीच असेल. सहकारी संस्था आणि ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या माध्यमातून कुरिअर सेवाही सुरू करण्यात येणार असल्याचे एनएफटीसीकडून सांगण्यात आले. ही कुरिअर सेवा अनेक राज्यांमध्ये कार्यरत असेल.

( हेही वाचा : Father’s Day 2022 : वडिलांना आकर्षक व्हॉट्सअ‍ॅप Sticker पाठवून द्या शुभेच्छा…जाणून घ्या सोपी प्रक्रिया)

एनएफटीसीने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही वर्षांत १० लाख लोकांना या परिवहन सेवेद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ४० लाख लोकांना फायदा होणार आहे. सहकार टॅक्सी, सहकार जल, सहकार रेस्टॉरंट, सहकार फूड या विविध योजनांद्वारे एनएफटीसीच्या माध्यमातून येत्या काही वर्षात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. NFTC ने नॅशनल कॅपिटल रीजन (NCR) मध्ये एक नवीन सेंट्रल बोर्ड ऑफिस आणि YouTube चॅनल सुरू केले आहे. या नवीन संरचनेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रकल्प सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डीएन ठाकूर यांच्या हस्ते झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here