Sahyadri Pratishthan : सह्याद्री प्रतिष्ठानकडून भोरगिरी किल्ल्यावर भव्य राजमुद्रेची स्थापना

Sahyadri Pratishthan : ही राजमुद्रा ५० किलो वजनाची आहे. ती ९ फूट x ८ फुटांची आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या १०० हून अधिक शिवप्रेमी युवकांनी शिवमुद्रा स्थापन करण्यास पुढाकार घेतला.

179
Sahyadri Pratishthan : सह्याद्री प्रतिष्ठानकडून भोरगिरी किल्ल्यावर भव्य राजमुद्रेची स्थापना
Sahyadri Pratishthan : सह्याद्री प्रतिष्ठानकडून भोरगिरी किल्ल्यावर भव्य राजमुद्रेची स्थापना

पुणे जिल्ह्यातील भोरगिरी किल्ला (Bhorgiri Fort) हा तसा दुर्लक्षित किल्ला ! येथील शिवमंदिर अत्यंत जागृत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक भाविकांची ये-जा असते. मात्र किल्ला म्हणून त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने किल्ल्यावर एका भव्य राजमुद्रेची स्थापना करण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक चंद्रशेखर धन्वंतरी यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभारण्यात आले आहे. (Sahyadri Pratishthan)

(हेही वाचा – Fraud : ब्रॅण्डेडच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, कुर्ल्यातला बूट बाजार गुन्हे शाखेच्या रडारवर)

New Project 2024 03 28T194426.898 1

राजमुद्रेच्या माध्यमातून युवकांना किल्ल्यावरील शौर्याचे स्मरण होईल – यज्ञेश सुंबरे

ही राजमुद्रा ५० किलो वजनाची आहे. ती ९ फूट x ८ फुटांची आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या १०० हून अधिक शिवप्रेमी युवकांनी शिवमुद्रा स्थापन करण्यास पुढाकार घेतला. या शिवमुद्रेच्या स्थापनेसाठी लागणारे सिमेंट, साहित्य आणि ती शिवमुद्राही शिवप्रेमी युवकांनीच गडावर नेले. ही मोहीम रात्री चालू करण्यात आली. पहाटे ४.५० मिनिटांनी राजमुद्रा उभारण्याचे काम पूर्ण झाले. या राजमुद्रेच्या माध्यमातून युवकांना किल्ल्यावरील शौर्याचे स्मरण होईल, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे यज्ञेश सुंबरे यांनी दिली. (Sahyadri Pratishthan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.