चांदिवली, काजूपाडा येथील शिवाजी विद्यालय परिसरात ॐ साई शरण श्री लॉरेन्स बाबा सेवा ट्रस्ट तर्फे साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई-शिर्डी पायी पालखी यात्रेची सांगता ५ फेब्रुवारी रोजी झाली. यानिमित्त या साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईबाबांची आरती आणि भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून येथे साई पालखीची सांगता भंडाऱ्याचे (Sai Bhandara) आयोजन करून करण्यात येते.
५ ते ६ हजार लोकांनी या साईपालखी सांगतेनिमित्त आयोजित केलेल्या या भंडाऱ्याचा लाभ घेतला. ओम साई शरण श्री लॉरेन्स बाबा सेवा ट्रस्टद्वारे दरवर्षी मुंबई-शिर्डी पदयात्रेचा पालखी प्रवास आयोजित केला जातो. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्ती या भंडारा सोहळ्यावेळी उपस्थित असतात.
(हेही वाचा – BJP: ‘गाव चलो अभियाना’च्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार – आमदार देवयानी फरांदे)
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, अध्यक्ष लॉरेन्स डिसोझा, नेन्सी डिसोझा, मेलविन डिसोझा, मनोज नाथानी, विमलेश दुबे, बाबू बत्तेली, अॅड. कैलास आगवणे, प्रयाग दिलीप लांडे, सुभाष गायकवाड, रत्नाकर शेट्टी, रियाझ मुल्ला, अजीज खान, शिवाजी लोंढे, राजेश साळे, पद्माकर हबीब, उमा माळी, राजकुमार विश्वकर्मा, बृजेश सिंह, नारायण कोळी (अण्णा), चंद्रकांत धडके, दिपक बारीया, विलास माने, दत्ता पाटील, चंद्रकांत पालेकर, सुनील मोहिते, साईनाथ कटके, संतोष गुप्ता हे यावेळी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community