अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले. या संदर्भात तपासादरम्यान दिपक कनोजिया (Deepak Kanojia) याला छत्तीसगड-मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गमधून ताब्यात घेतलं आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे. अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून 16 जानेवारीच्या मध्यरात्री हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर चाकू हल्ला करणाऱ्याची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोरांच्या तपासासाठी 20 पथकं तयार करण्यात आली आहेत. सर्व बाजूनं तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली. त्यातच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
( हेही वाचा : मुंबईत आणखी ३०० नव्या Local सेवा सुरू होणार; केंद्रीय रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती)
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) जिल्ह्यातील भोपाळ गावात संशयित लपल्याची गोपनीय माहिती रेल्वे पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या आधारावर, रेल्वे पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिसांना त्याची माहिती दिली. यानंतर, मुंबई पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात पोहोचले आणि संशयिताला मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू केली. यापूर्वी, मुंबई पोलिसांनी संशयिताशी जुळणारे आणखी तीन जणांना ताब्यात घेतले होते, परंतु पुष्टी न मिळाल्यामुळे पोलिसांनी चौकशीनंतर तिघांनाही सोडून दिले. या कारणास्तव, पोलिस पूर्ण खात्री झाल्यानंतरच दीपकला अटक करतील, असे सांगण्यात येत आहे
अधिक माहिती अशी की, सैफवर (Saif Ali Khan) हल्ल्या केल्यानंतर संशयित 7 ते 8 तास नंतर हल्लेखोर दादरच्या रस्त्यांवर मोकाट फिरत होता. दादरमधील विविध रस्त्यांवर असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये त्याला टिपण्यात आलंय. जेव्हा तो वांद्रे येथून निघाला तेव्हा लाल शर्ट होता आणि दादरला पोहोचला तेव्हा निळा शर्ट. त्याने एका दुकानातून हेडफोन देखील खरेदी केले. सैफच्या वांद्र्यातील घरासमोर रात्री उशिरा सुरू असलेल्या दुकान मालकांचीही पोलिसांनी चौकशी केली. 50 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्याची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. रात्री फिरणाऱ्या लोकांची देखील मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) चौकशी करण्यात आली.
सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) शरीरावर चाकूने सहा वेळा वार करण्यात आले. यातील दोन वार त्याला खूप खोलवर लागले. ज्यामुळे सैफची सर्जरी करावी लागली. डॉक्टरांनी त्याच्या हाडांमध्ये अडकलेला चाकूचा भाग बाहेर काढला. लीलावती हॉस्पिटलचे सीईओ डॉ. नीरज उत्तमनी यांनी सांगितलं, शुक्रवारी सैफ अली खानला आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये दाखल करण्यात आलं. आता तो ठीक असून त्याला रिकव्हर व्हायला आणखी काही दिवस लागतील. सैफला सोमवारपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो. (Saif Ali Khan)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community