१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी Congress चा माजी खासदार दोषी; १८ फेब्रुवारीला न्यायालय ठोठावणार शिक्षा

50
१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी Congress चा माजी खासदार दोषी; १८ फेब्रुवारीला न्यायालय ठोठावणार शिक्षा
१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी Congress चा माजी खासदार दोषी; १८ फेब्रुवारीला न्यायालय ठोठावणार शिक्षा

१९८४च्या शीख विरोधी दंगलींदरम्यान (1984 anti-Sikh riots) झालेल्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात (Delhi) न्यायालयाने काँग्रेसचे (Congress) माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांनी दोषी ठरवले आहे. आता १८ फेब्रुवारी रोजी सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. हे प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील (Delhi) सरस्वती विहार परिसरात एका शीख बाप, लेकाच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांच्यावर जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या भडकवण्यावरूनच जमावाने दोन शिखांना जिवंत जाळल्याचा आरोप आहे.

( हेही वाचा : MSCPCR कडून ‘बालरक्षा अभियान’ आणि ‘बालस्नेही पुरस्कार’ या महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा

१९८४च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे (Congress) माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलोन (Jagdeep Kahlon) म्हणाले, “४० वर्षांपूर्वी शीख हत्याकांडाचे नेतृत्व करणाऱ्या सजन्न कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना आता शिक्षा होईल, यासाठी मी न्यायालयाचे आभार मानतो. सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो, असेही काहलोन म्हणाले.

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयावर भाजपा नेते मनजिंदर सिंग सारसा (Manjinder Singh Sirsa) म्हणाले की, आज सज्जन कुमार यांना शीखविरोधी दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांनी नरसंहार केला. काँग्रेसचे सर्व पाप उघडकीस येत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानतो ज्यांनी एसआयटी स्थापन केली आणि या लोकांना तुरुंगात टाकले. आज देवाने न्याय दिला, असेही सारसा म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.