जालना शहरात सोमवार, 23 सप्टेंबर रोजी सकल हिंदू (Hindu) समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. जालना शहरात चार दिवसांपूर्वी ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडलेल्या एका घटनेच्या निषेधार्थ आजचा हा बंद पुकारण्यात आला होता.
हिंदू (Hindu) व्यापाऱ्यांच्या दुकानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या व वाढत्या गोहत्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी जालना शहर बंदची हाक देण्यात आली होती. या वेळी विराट मूकमोर्चा काढण्या आला. दरम्यान, जालना शहरातील भाजीपाला मार्केट, काही शाळा बंद ठेवण्यात आल्या. सेंट मेरीज हायस्कूलमधील सहामाही परीक्षेचा आजचा पेपर देखील पुढे ढकलण्यात आला.
(हेही वाचा Tirupati Balaji Laddu Adulteration प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची Supreme Court मध्ये मागणी)
दोन दिवसांपूर्वी जालन्यात एका धार्मिक कार्यक्रमाच्या रॅलीदरम्यान व्यापाऱ्यांच्या दुकानावर भांडण झाले होते. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांकडून या प्रकाराचा निषेध करून जालना बंदची हाक देण्यात आली होती. यानिमित्ताने भव्य विराट मूकमोर्चा काढण्यात आला. सकाळी 10 वाजता मोर्चाला बडी सडक येथून सुरुवात झाली. हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून गांधीचमन पर्यंत काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चात कोणत्याही धर्म, पंथाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली नाही. जालना बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद देत जालन्यातील बाजारपेठ, कपडाबाजार, किराणा बाजार अशी सर्वदालने या निमित्ताने बंद ठेवण्यात आली होती.