राज्यातील कारागृहामध्ये विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना पगारवाढ लागू करण्यात आली आहे. या पगारवाढीचा फायदा राज्यातील विविध कारागृहांत असलेल्या ७ हजार कैद्यांना होणार आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी पगारवाढीचा आदेश जारी केला असून २० ऑगस्टपासून ही पगार वाढ लागू होणार आहे.
राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत, नऊ मध्यवर्ती कारागृहे आणि ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृह आणि १ महिला कारागृहे आहे. कारागृहाची क्षमता २४ हजार ७२२ कैद्यांची असून सध्याच्या घडीला या कारागृहांमध्ये ४१ हजार ७५ कैदी आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात न्यायबंदी, आणि न्यायाच्या प्रतीक्षेतील कैदी आहेत. शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या जवळपास ७ हजार आहे. शिक्षा झालेल्या कैद्यासाठी कारागृहात विविध उद्योगांत असून त्यांना त्या ठिकाणी क्षमतेप्रमाणे काम दिले जाते. कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, कागदकाम, फाउंड्री, कार वॉशिंग सेंटर, इस्त्री, गॅरेज ,उपहारगृहे, वेल्डिंग यासारखे अनेक उद्योग कारागृहात राबविण्यात येतात.
( हेही वाचा – Fire In Udyan Express: बंगळुरुमध्ये रेल्वे स्थानकावर थांबलेल्या उद्यान एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागली भीषण आग)
या उद्योगातून मिळणारे उत्पादनाची कारागृहाबाहेर विक्री करण्यात येते. कारागृहात शेती हा प्रमुख उद्योग मानला जातो, त्यातून येणारे उत्पादने, धान्य हे भाजीपाला राज्यातील सर्व कारागृह पाठवले जाते. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी ७००० कैदी काम करतात, त्यात पुरुष कैदी ६३०० व महिला कैदी ३०० च्या आसपास काम करतात. कैद्यांना प्रत्येक ३ वर्षांनी पगार वाढ होत असते, यंदाच्या पगारवाढीत ५ ते ७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही पगार वाढ २० ऑगस्ट २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
कुशल कैदी – पूर्वी ६७ रुपये वाढ होऊन ७४ रुपए,अर्धकुशल कैदी- पूर्वी ६१ रुपये वाढ होऊन ६७रुपये,अकुशल बंदी – पूर्वी ४८ वाढ होऊन ५३ रुपये
खुल्या वसाहतीतील कैद्यांना पूर्वी ८५ वाढ झाली होती. त्यानंतर आता ९४ रुपये वाढ झाली आहे. या पगारवाढीचा लाभ ७००० कैद्यांना होणार असल्याचे कारागृह अधिकारी यांनी म्हटले आहे.