Salary Negotiation Tips : गुगलच्या माजी एचआर प्रमुखाकडून तरुणांना पगार वाढवण्याच्या टिप्स

150
Salary Negotiation Tips : गुगलच्या माजी एचआर प्रमुखाकडून तरुणांना पगार वाढवण्याच्या टिप्स
  • ऋजुता लुकतुके

गुगल कंपनीचे माजी एचआर प्रमुख नोलान चर्च यांनी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पगाराच्या वाटाघाटी कशा करायच्या याचे काही मोलाचे सल्ले दिले आहेत. नोलान स्वत: सहा वर्षं गुगलमध्ये होते. आणि सध्या ते सॅलरी डेटा कंपनी फेअरकॉम्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘तुम्ही पगाराबद्दल कधी विचारलं नाहीत, तर उत्तर नाही असंच असणार आहे,’ असं त्यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सुरुवातीच सांगितलं. पण, त्याचबरोबर पगार नेमका कसा आणि किती मागावा याविषयीही त्यांनी काही सल्ले तरुणांना दिले. (Salary Negotiation Tips)

कंपनी पगाराची रक्कम कशी ठरवते याची त्यांनी प्राथमिक माहिती दिली. ‘जगभरातील कंपन्या विशिष्ट कामासाठी किती पगार देत आहेत, याची पुरेपूर माहिती कंपन्यांना असते. ही माहिती काढण्यासाठीच कंपन्या काही लाख रुपये खर्च करत असतात. आणि या माहितीवर आधारित आपलं पगाराचं पॅकेज ठरवतात. दुसरी गोष्ट कंपन्यांना ठरवायची असते की इतर कंपन्यांपेक्षा ते कमी देणार, जास्त देणार किंवा किती देणार. याला पगाराची मानसिकता म्हणतात. कंपनीचं हे धोरण आधीच ठरलेलं असतं. आणि ते एकदा ठरल्यावर तळाची किंमत योग्य वाटलेल्या उमेदवाराला सांगितली जाते,’ असं नोलान म्हणतात. (Salary Negotiation Tips)

(हेही वाचा – Whatsapp Changes : व्हॉट्सॲपमध्येही आता दिसणार नाईट मोड)

मग पगाराची बोलणी करताना उमेदवाराने काय केलं पाहिजे?

नोलान यांच्या शब्दांत सांगायचं तर – ‘पगाराची पहिली ऑफर ऐकल्यावर नम्रपणे कंपनीला सांगा की, मला ही ऑफर मिळाल्यामुळे मी खुश आहे. पण, विचार करण्यासाठी मला दोन दिवसांचा वेळ द्या. या दोन दिवसांत तुम्हीही तुमचा अभ्यास करा. तुम्हाला देऊ केलेलं पद आणि त्यासाठी दिला जाणारा पगार यांचा ताळमेळ नीट बसवा. त्या जागी काम करणाऱ्या ओळखीच्या लोकांचा सल्ला घ्या. आणि मग कंपनीला तुमचा एखादा आकडा सांगा.’ (Salary Negotiation Tips)

नोलान पुढे म्हणतात, कदाचित कंपनी तुम्हाला हवा तितका पगार देणार नाही, थोडा कमी देईल. पण, निदान तुमच्या म्हणण्याचा विचार होईल. कारण, ‘तुम्ही विचारलंतच नाही, तर तुम्हाला वाढील पगार मिळणारच नाही!’ त्यामुळे पगाराची बोलणी सुरुवातीलाच खूप महत्त्वाची असल्याचं नोलान चर्च यांचं म्हणणं आहे. (Salary Negotiation Tips)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.