बंदी घातलेल्या रंगात मिसळतोय हरभरा…तुम्ही खाताय फुटाणा…कसा ते वाचा

90

तुम्ही किराणा मालातून किंवा ऑनलाईन ग्रॉसरीतून भाजलेला फुटाणा घेत असाल तर सावधान वापरण्यास बंदी असलेल्या रंगात मिसळलेल्या हरभ-याला हळद आणि मीठ लावून भाजलेले फुटाणे सर्रास विक्रीला ठेवले जात आहेत. याबाबत एका अज्ञात व्यक्तीने अन्न व औषध प्रशासनाला पत्र लिहून तक्रार केली. त्यानंतर राज्यभरात सुरु असलेलया मोहिमेत बुलढाण्यात हा प्रकार आढळून आला आहे. बुलढाण्यातील हा रंगात मिसळलेला भाजलेला फुटाणा थेट नोएडात विक्रीला जात असल्याचे तपासाअंती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना समजले.

( हेही वाचा : बूस्टर प्रक्रियेत मुंबईला मागे टाकत ‘या’ जिल्ह्याची सरशी! )

स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बुलढाण्यातील चिखली भागांत हा प्रकार आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी यश ट्रेडर्स या दुकानात अचानक धाड टाकली. या धाडीत कडधान्यात वापरासाठी बंदी असलेला टेट्राझाईन स्पेशल या खाद्य रंगाचा वापर करुन हरभ-यावर रंग लावला जात होता. त्यात मीठ आणि हळद लावून भाजलेला फुटाणा बाजारात विक्रीसाठी दिला जायचा. फूड सेफ्टी एण्ड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून कडधान्यात टेट्राझाईन स्पेशल हा खाद्यरंग वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तब्बल ११ लाख २८ हजार २६७ किंमतीचा माल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला असून, बाजारात विक्रीला पाठवेला भाजलेला फुटाणा परत मागवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी यश ट्रेडर्सच्या मनिष अग्रवाल यांच्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.