कोरोना काळानंतर बांधकाम क्षेत्रातील मंदीसदृश्य वातावरण आता वेगाने निवळताना दिसत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तीन महिन्यांत म्हणजेच 2023च्या जानेवारी ते मार्च या महिन्यांत घरांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
( हेही वाचा : गृहिणींचे बजेट कोलमडणार! दूध महागले, लिटरमागे २ रुपयांची वाढ )
देशात गतवर्षीच्या तुलनेत 14 तर पुणे शहरात घरांची विक्रीत तब्बल 42 टक्क्यांनी वाढली आहे. अनारॉक रिसर्च संस्थेने पुणे शहरासह मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि कोलकता या सात मोठ्या शहरांतील पाहणीच्या आधारे घरांच्या विक्रीचा अहवाल जाहीर केला आहे.
यानुसार सात मोठ्या शहरात जानेवारी 2023 ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत एकूण 1 लाख 13 हजार 770 घरांची विक्री झाली आहे. गतवर्षी हेच प्रमाण केवळ 99 हजार 500 घरांची विक्री असे होते. मुंबई आणि पुणे शहराचा एकूण घरांच्या विक्रीत जवळपास निम्मा म्हणजे 48 टक्के इतका आहे. तर, केवळ पुणे शहरात घरांच्या विक्रीत 42 टक्के अशी मोठी समाधानकारक वाढ झाल्याची नोंद आहे.
Join Our WhatsApp Community