अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. तसेच सलमान (Salman Khan) सोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा देखील केली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडून सुरक्षे संदर्भात दिलासा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणाले ?
पहाटे सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांच्या तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार, नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. (Salman Khan)
पोलीस उपायुक्तांची प्रतिक्रिया
सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी या घटनेबाबत माहिती देतांना म्हटले आहे की, “पहाटे पाचची घटना आहे. घराबाहेर रस्त्यावर फायरिंग झालेली आहे. तपासासाठी आम्ही टीम तयार केलेले आहेत. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कुणावर संशय वगैरे काही नाही. तसेच, जबाबदारी वगैरे असं कोणी स्वीकारली असा अद्याप काही नाही.” असं राज तिलक रौशन म्हणाले. (Salman Khan)
हे पहा –
Join Our WhatsApp Community