-
ऋजुता लुकतुके
ओपन एआय कंपनीने अलीकडेच चॅट जीपीटी मार्फत गिबली स्टुडिओ फोटो आर्ट सुविधा लोकांना उपलब्ध करून दिली. काही दिवसांतच ही सेवा कमालीची लोकप्रिय झाली आणि एका तासांत चॅट जीपीटीचे सदस्य १० लाखांनी वाढले. सोशल मीडियावर गिबली फोटो टाकण्याची एक प्रकारे चढाओढच सुरू झाली आहे. खुद्द ओपन एआयचे संस्थापक सॅम ऑल्टमन यांनाही गिबली स्टुडिओ वापरण्याची हुक्की आली. त्यांनी चक्क भारतीय क्रिकेट जर्सीतील आपला गिबली फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. (Sam Altman)
(हेही वाचा – Hindu Village : मध्य प्रदेशात बनणार देशातील पहिले ‘हिंदू गाव’; बागेश्वर धाम म्हणाले, हा हिंदू राष्ट्राचा पाया)
ऑल्टमन यांनी स्वत: आपल्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. ‘सॅम ऑल्टमन क्रिकेटपटूच्या वेशात, ते ही ॲनिमेशन स्वरुपात!’ असा मथळा ऑल्टमन यांनी या फोटोला दिला आहे. चॅट जीपीटीने गिबली स्टुडिओच्या सहयोगाने ही सेवा २५ मार्चपासून सुरू केली. चॅट जीपीटीची प्रो, पेड आणि प्लस सेवा वापरणाऱ्यांना ही सेवा तत्काळ वापरता येईल. तर सामान्य सदस्यांना गिबली आर्टसाठी थांबावं लागेल. त्यांनी फोटो दिल्यानंतर काही वेळाने तो गिबली आर्ट स्वरुपात मिळेल. (Sam Altman)
(हेही वाचा – Virat Kohli Injury Update : दुखापतीमुळे विराट कोहली पुढचा सामना खेळणार की नाही; मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर काय म्हणाले?)
prompt: sam altman as a cricket player in anime style pic.twitter.com/kgflS6dT6o
— Sam Altman (@sama) April 2, 2025
ऑल्टमन यांनी भारतीय जर्सीतील फोटो टाकून भारतीय बाजारपेठेविषयी त्यांच्या भावनाच एक प्रकारे व्यक्त केल्या आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारतात सुरू असलेले प्रयोग आणि त्यांना मिळालेलं यश हे थक्क करण्यासारखं आहे. या क्षेत्रातही भारत इतर देशांना मागे टाकत आहे,’ असं ऑल्टमन यांनी अलीकडेच एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. ओपन एआय कंपनीला वाटत असलेली भारतीय बाजारपेठेबद्दलची उत्सुकता यातून दिसते. (Sam Altman)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community