इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी बुधवारी, (८ मे) रोजी भारताच्या विविधतेवर भाष्य करून आणखी एक वाद निर्माण केला. भारत देश हे जगातील लोकशाहीचे एक उत्तम उदाहरण असल्याबद्दल बोलताना पित्रोदा म्हणाले की, या देशातील लोक ७५ वर्षांपासून अतिशय आनंदी वातावरणात जगत असून येथील लोकं आपआपसांत भांडणे न करता एकत्र राहू शकतात.
(हेही वाचा – Bombay High Court: औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर विरोधाच्या याचिकेबाबत काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालय? जाणून घ्या)
त्यांनी पुढे असे वादग्रस्त विधान केले आहे की, ”आपण भारतासारख्या विविधता असलेल्या देशाला एकत्र आणू शकतो, जिथे पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात. उत्तरेकडील लोक गोऱ्या लोकांसारखे दिसतात आणि कदाचित दक्षिणेकडील लोक आफ्रिकी लोकांसारखे दिसतात.”
वारशाबाबत वाद
यापूर्वीही, पित्रोदा यांनी अमेरिकेत प्रचलित असलेल्या वारसा कराच्या संकल्पनेबद्दल बोलताना वाद निर्माण केला होता आणि ते म्हणाले होते की, “अमेरिकेत वारसा कर आहे. जर कोणाकडे १० कोटी अमेरिकी डॉलर्सची संपत्ती असेल आणि जेव्हा ते मरण पावतात तेव्हा फक्त ४५ टक्के आपल्या मुलांना हस्तांतरित करू शकतो, तर ५५ टक्के सरकार बळकावते. हा एक मनोरंजक कायदा आहे. पित्रोदा म्हणाले, “तुम्ही तुमच्या पिढीमध्ये संपत्ती निर्माण केली आणि आता तुम्ही सोडून जात आहात, तुम्ही तुमची संपत्ती जनतेसाठी सोडली पाहिजे. तीसुद्धा अर्धी नाही, तर जी मला योग्य वाटते.”
हेही पहा –