Samajwadi Party मधील नेत्याच्या हॉटेलमध्ये पनीरऐवजी दिले मांस; संतप्त नागरिकांची पोलिसात धाव

67
Samajwadi Party मधील नेत्याच्या हॉटेलमध्ये पनीरऐवजी दिले मांस; संतप्त नागरिकांची पोलिसात धाव
Samajwadi Party मधील नेत्याच्या हॉटेलमध्ये पनीरऐवजी दिले मांस; संतप्त नागरिकांची पोलिसात धाव

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी (Varanasi) येथे एका हॉटेलमध्ये ९ जणांना पनीर सांगून मांस खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक व्यक्ती हॉटेलमध्ये जेवताना त्याला जेवणाची चव व्यवस्थित न लागल्याने त्याला जेवणात काहीतरी वेगळा पदार्थ असल्याचा संशय आला. त्यावेळी पनीर सांगून हॉटेलमधील लोकांनी मांस खाऊ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र हे रेस्टॉरंट सपा (samajwadi Party) नेत्याच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

( हेही वाचा : Arunish Chawla यांची महसूल सचिवपदी नियुक्ती; अर्थसंकल्पाच्या ५ आठवडे आधी प्रशासकीय फेरबदल

याप्रकरणानंतर ग्राहकांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहचले. यामुळे बराच वेळ वादही झाला. या प्रकरणात ९ लोक होते त्याहून ४ जणांनी त्याच रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती दिली. (Uttar Pradesh) पीडितांनी सांगितले की, ते वाराणसीतील (Varanasi) हॉटेल अद्रिका येथे थांबले होते. त्यातील एकूण ९ लोक संबंधित रेस्टॉरंट येथे आले होते. त्यातील ४ जणांनी पनीरचा पदार्थ खाण्यासाठी मागवला. मात्र, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांनी पनीरऐवजी चिकन खाऊ घातले. याप्रकरणाची पुष्टी केल्यानंतर मॅनेजर आणि वेटर या दोघांना धारेवर धरले गेले. दरम्यान हॉटेलात एकाच पातेल्यात शाकाहारी आणि मांसाहर पदार्थ बनवले जात असल्याचे पीडितांनी सांगितले.

या हॉटेलमधील कर्मचारी हे मुस्लिम आहेत. त्यामुळे हा गोंधळ झाला असावा असे आरोप पीडित लोकांचे म्हणणे आहे. हे हॉटेल समाजवादी पक्षाचे (samajwadi Party) नेते ओपी सिंह यांचे आहे. यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर ऑर्डर दिलेल्या जेवणाच्या ताटाची आदलाबदल झाल्याचे हॉटेल मॅनेजरने स्पष्टोक्ती दिली. (Varanasi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.