कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या Samajwadi Party चे खासदार मातोश्रीवर; सोशल मीडियावर टिकेची झोड

190
कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या Samajwadi Party चे खासदार मातोश्रीवर; सोशल मीडियावर टिकेची झोड
कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या Samajwadi Party चे खासदार मातोश्रीवर; सोशल मीडियावर टिकेची झोड

अयोध्या (Ayodhya) ज्या लोकसभा मतदारसंघात येते त्या फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद (Avadhesh Prasad) यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. ते अवधेश प्रसाद मुंबई दौऱ्यावर आले असता, त्यांनी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या वेळी समाजवादी पक्षाचे आझमगडचे खासदार धर्मेंद यादव, आमदार नफिस अहमद, आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख हेही उपस्थित होते.

मातोश्रीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर उभे राहून सत्कारही करण्यात आला.

(हेही वाचा – Budget Session 2024: मित्रांना मोदी सरकारचं ‘मोठं गिफ्ट’; बिहारसाठी २६ हजार कोटी, तर आंध्रप्रदेशसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद)

समाजवादी पक्षाच्या नेत्यांना मातोश्रीने घातलेल्या या पायघड्यांनंतर शिवसैनिकांना रामजन्मभूमी लढ्याची आठवण आली आहे. कारसेवकांनी बाबरी ढाचा पाडला, तेव्हा उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांचे सरकार सत्तेत होते. त्या वेळी मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसैनिकांनी कारसेवा केली असेल, तर त्यांचा मला अभिमान आहे’, असे वक्तव्य करून कारसेवकांना अभय दिले होते. त्याच बाळासाहेबांच्या निवासस्थानी समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे चाललेले कोडकौतुक हा सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. मातोश्रीमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर अन्य मान्यवरांनी पायातली चप्पल काढलेली असतांना अवधेश प्रसाद हे मात्र बूट घालून उभे आहेत, यानेही अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

‘आज खरोखर विचार करण्यासारखी बाब आहे की, ज्या हजारो हिंदू कारसेवकानी आपल्या प्राणाचे बलीदान दिले, त्यांच्या आत्म्याला व हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला नक्कीच ठेच पोहोचली असेल’, अशा भावना फेसबूकवर व्यक्त केल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.