संभाजीनगर येथील वाळूज भागात एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी परिसरात खळबळ उडाली आहे. संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासांत अटक केली.
ही घटना वाळूजजवळील पंढरपूर येथे गुरुवारी, 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पंढरपूर येथील एका मंदिराच्या पाठीमागेच राहणारी 4 वर्षाची अल्पवयीन मुलगी सायंकाळी 7च्या सुमारास मंदिरात हरिपाठासाठी गेली होती. तेव्हा तिची आई तिच्यासोबत नसून ती घरीच होती, मात्र ही लहान मुलगी मंदिरात गोंधळ घालत असल्यामुळे तिच्या बहिणीने तिला घरी पाठवले. त्यामुळे ती मंदिराच्या बाहेर पडली तेव्हा आरोपी त्याच रस्त्याने कंपनीतून घरी परतत होता. त्याने अंधाराचा फायदा घेऊन या लहानग्या मुलीचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
(हेही वाचा – ST Bus : ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रमाचे मुख्यमंत्री शिंदेंनी केले कौतुक)
संभाजी होनाजी धावरे (35, रा. सारा विहार वाळूज, मूळ गाव रा. दैठण ता. गेवराई जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी धावरे हा एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. गुरुवारी सायंकाळी 6 ते 11 च्या दरम्यान आरोपीने या लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांना धक्का बसला. त्यांनी तिची चौकशी केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. तिच्या पालकांनी लगेचच संभाजीनगर एमआयडीसी पोलीस स्थानकात या घटनेची तक्रार नोंदवली.
याप्रकरणी वाळूज एमआयडीची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी आरोपीच्या शोधासाठी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका तलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीच मुलीच्या पालकांना सोबत घेऊन घटना घडलेल्या परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली.
Join Our WhatsApp Community