छत्रपती संभाजीनगरच्या (Chatrapati Sambhajinagar) वाळूज(waluj) औद्योगिक वसाहतीत शनिवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. सनशाईन एंटरप्राईज या हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनी मध्ये ही घटना घडली आहे. या कंपनी मध्ये झोपेत असतानाच ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Fire)
तर कंपनीतील चार कामगारांनी बाहेर पडून आपला कसाबसा जीव वाचवला आहे. ही आग कशामुळे लागली हे अदयाप समजू शकले नाही. वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लव्ह बनवणारी सनशाईन एंटरप्राईज कंपनी आहे. या कंपनीला मध्यरात्री अचानक आग लागली. (Fire)
(हेही वाचा : Eknath Shinde: मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू करावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा)
या कंपनीमध्ये जवळपास २० ते २५ कामगार काम करतात. या दुघटनेत ६ कामगारांचा जळून मृत्यू झाला. या कंपनी मध्ये सी २१६ हॅंडग्लोज तयार करते. सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. पहाटे चार वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते, त्यानंतर आग विझवण्यात यश आलं. हे सर्व कामगार हे बिहारचे रहिवासी आहे.
हेही पहा –