बेकायदेशीर दुकानांकडून भाडे वसूल करणाऱ्या मशिद कमिटीसह दुकानदारांना Yogi government चा इशारा

44
बेकायदेशीर दुकानांकडून भाडे वसूल करणाऱ्या मशिद कमिटीसह दुकानदारांना Yogi government चा इशारा
बेकायदेशीर दुकानांकडून भाडे वसूल करणाऱ्या मशिद कमिटीसह दुकानदारांना Yogi government चा इशारा

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणावर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. आता जिल्हा प्रशासनाने संभलमधील एका मशिदीशेजारी बनलेल्या दुकानाला तोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील एका दुकान तोडण्यात आले आहे. ही कारवाई एका जुन्या विहिरीच्या खोदकामादरम्यान करण्यात आली. तसेच दुकाने ही सरकारी जमिनीवर उभारल्याची माहिती आहे. मात्र या दुकानांचे भाडे मशिदी कमिटी वसूल करत होती. या दुकानांना २४ तासांचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. (Yogi government)

( हेही वाचा : Chandrapur येथील मंदिरात चोरी; बंदुकीचा धाक दाखवून फोडली दानपेटी

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संभलच्या (Sambhal) कोतवालीमधील (Kotwali) मशिदीजवळील एका विहिरीच्या खोदकामाच्या कामावेळी डीएम राजेंद्र पैसिया (Rajendra Paisia) यांना आजूबाजूला अतिक्रमण केल्याचे आढळले. दि. १२ जानेवारी रोजी त्यांनी या अतिक्रमणासंदर्भात चौकशी केली असता. या ठिकाणावरील १२ दुकाने बेकायदेशीर असल्याचे लक्षात आले. यातील एक दुकानावर लगेच कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर ११ दुकानांना ही अल्टीमेटम देण्यात आले आहे. एसडीएम वंदना मिश्रा यांनी सांगितले की, येथील दुकानांनी अर्ध्याअधिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. (Yogi government)

दुकानदारांकडे या जागेसंदर्भात कोणतीही कागदपत्र आढळले नाहीत. एसडीएम वंदना मिश्रा (Vandana Mishra) यांनी त्यानंतर दुकानदारांची बैठक घेतली. तसेच दुकानदारांना अल्टीमेटम देत २४ तासात अतिक्रमण स्वत: हून हटवण्यास सांगितले. अन्यथा प्रशासन बुलडोजरद्वारे कारवाई करत सर्व दुकाने तोडले असेही सांगण्यात आले. तसेच ही दुकाने सरकारी जमिनीवर कब्जा करून थाटण्यात आल्याचे ही निदर्शनास आले. त्याचबरोबर या जमिनींचे भाडे मशीद कमिटी वसूलत असल्याचे कळले. मात्र प्रशासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर काहींनी दुकान खाली करण्यास सुरुवात केली आहे. (Yogi government)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.