काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. याची दखल घेत उत्तर प्रदेशातील संभल येथील जिल्हा न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आणि ४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. (Sambhal News)
(हेही वाचा – HSRP New Deadline: वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवली; ‘ही’ आहे अंतिम तारिख)
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभल येथील एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावली आहे. हिंदू शक्ती दलाचे (Hindu Shakti Dal) राष्ट्रीय अध्यक्ष सिमरन गुप्ता (Simran Gupta) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे-II) निर्भय नारायण सिंह यांनी हा आदेश दिला. १५ जानेवारी या दिवशी दिल्ली काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राहुल गांधी म्हणाले होते की, आमची लढाई केवळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाही, तर भारतीय राज्याशीही आहे. या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस
सिमरन गुप्ता यांनी यापूर्वी संभलचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती; परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने तिने २३ जानेवारी दिवशी चंदौसी येथील संभलच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. वकील सचिन गोयल म्हणाले की, न्यायालयाने त्यांची तक्रार स्वीकारली आहे आणि त्याची दखल घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी नियोजित वेळी होईल, ज्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पुढे नेली जाईल. (Sambhal News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community