Sambhal मधील हिंसाचाराचा ISI आणि दाऊदशी संबंध; पाकिस्तानी काडतूस नाल्यातून जप्त

90
Sambhal मधील हिंसाचाराचा ISI आणि दाऊदशी संबंध; पाकिस्तानी काडतूस नाल्यातून जप्त
Sambhal मधील हिंसाचाराचा ISI आणि दाऊदशी संबंध; पाकिस्तानी काडतूस नाल्यातून जप्त

संभल (Sambhal) पोलिसांनी शंका आहे की, दुबईत राहणारा शारिक साठा (Sharik Satha) हा दि. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड आहे. तो मुळात संभल येथील रहिवाशी आहे. पण आता तो आयएसआयसाठी (ISI) काम करतो. त्याचा दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) गँगसोबतही संबंध आहे. त्यामुळे पाकिस्तानी गोळ्या संभल येथे पाठवण्यामागे त्याचा हात असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यात संभल पोलिस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

( हेही वाचा : Mohammad Askar ने केला ३ वर्षाच्या हिंदू मुलीवर बलात्कार; दुकानात वस्तू खरेदी करायला गेली अन्…

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संभलमधील (Sambhal)दीपा सराय येथे राहणारा शारिक साठा (Sharik Satha)सध्या दुबईत राहतो. तो भारतातून २०२० ला पळून दुबईत गेला. त्यासाठी त्याने बनावट पासपोर्टचा वापर केला. त्याआधी तो दिल्लीतील तिहाड तुरुंगात कैद होता. भारतात तो मोठ्या गाड्या चोरी करणाऱ्या टोळीचा प्रमुख होता. तो भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गाड्या चोरून नेपाळमध्ये विकत असे. त्याच्या गँगमध्ये अनेक लोक सहभागी होते. दिल्लीमध्ये त्यांच्या गँगने ३०० गाड्या चोरल्याची माहिती आहे.

शारिक साठाव उत्तर प्रदेशसकट (Uttar Pradesh) बाकीच्या राज्यात ही गुन्हे दाखल आहेत. दुबई पळून गेल्यानंतर त्याची गँग गाडी चोरीऐवजी बनावट नोटांचा व्यापार करते. शारिक साठा हे काम पाकिस्तानची गुप्तखेर संघटना आयएसआय आणि दाऊद इब्राहिमच्या गँगद्वारे करतो. (Sambhal) शारिक साठा (Sharik Satha)याची टोळी भारतात त्याचा व्यापार चालवते. तसेच वेळ पडल्यास त्याला भेटण्यासाठी दुबईही जाते. २०२१ मध्ये त्यांच्या दोन साथीदारांना ४ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पकडण्यात आले. तो त्यांनी साठाचे नाव घेतले. ते दोन्ही साथीदारही संभलचे रहिवाशी आहेत.

संभल पोलिसांचा संशय आहे की, दि. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसेत साठाच्या साथीदारांचा समावेश असू शकतो. तसेच शारिक साठा यानेच दुबईतून हिंसाचाराला मदत केल्याचा ही संशय आहे. पोलिसांना हिंसेच्या काही दिवसांनी नाल्यात पाकिस्तान सरकारच्या कारखान्यात तयार झालेली काडतुसे मिळाली. (Sambhal) पोलिसांना संशय आहे की, हे काडतूस साथीदाराच्या साहाय्याने शारिक (Sharik Satha)याने भारतात पाठवली असतील. पोलिस आता शारिकचे जुने गुन्हे आणि त्यांच्या साथीदारांची माहिती गोळा करत आहे. याआधी दि. २८ डिसेंबर रोजी पोलिसांनी हिंसाचार घडवून आणणाऱ्या दोघांना दिल्लीतील बाटला हाऊस येथून अटक केली आहे. (Sambhal)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.