भा.दं.वि. कलम 377 हटवल्यावर भारतात समलैंगिकते Same Sex Marriage ला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर आता समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांची नियमित सुनावणी होऊन त्या आता सर्वाेच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न चालू आहे. एरवी नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता Same Sex Marriage विषयासाठी न्यायालयाकडे वेळ आहे. कुठले तरी चुकीचे कायदे आणून पती-पत्नीच्या पवित्र विवाहबंधनाला धोका निर्माण केला जात आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता देऊन या देशाची आणखी अधोगतीकडे वाटचाल चालू होईल याचा सरकार आणि समाज यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सुभाष झा यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयात एवढे महत्त्व का?’ या ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.
#SameSexMarriage will definitely destroy the ecosystem and Natural Family order we all have to object and support the central government decision and complete oppose of same sex marriage in India
— Er.Rajeshwari Iyer திராவிடம் (@RajeshwariRW) April 27, 2023
वकील झा पुढे म्हणाले की, मुळात समलैंगिकता Same Sex Marriage हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्याप्रमाणे कोरोनासाठी सरकारने लस आणली, त्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहे. उद्या देशातील लाखो चोरांनी ‘चोरी करणे, हा आमचा घटनात्मक अधिकार आहे’ असे म्हटले, तर तो त्यांचा घटनात्मक अधिकार होऊ शकत नाही. तसेच समलैंगिकतेविषयी आहे.
(हेही वाचा Mumbai Police : मुंबई पोलिसांची १२५ अनधिकृत पान टपरींवर धडक कारवाई)
समलैंगिकतेच्या समर्थनार्थ याचिका न्यायालयात दाखल करणारे कोण आहेत? याचा सरकारने शोध घ्यायला हवा. इतिहास अभ्यासक मीनाक्षी शरण म्हणाल्या की, समलैंगिकता Same Sex Marriage ही रोम आणि ग्रीस देशांकडून आलेली विकृती आहे. यातूनच एड्स रोगाची उत्पत्ती झाली आहे. समलैंगिकतेला मान्यता देऊन पवित्र विवाह संस्था आणि कुटुंब व्यवस्था यांवर चौफेर आघात केले जात आहेत. हिंदु धर्मात विवाहाच्या वेळी पुरुष आणि स्त्री यांच्या मीलनाला शिव-शक्तीचे मीलन मानले गेले आहे. धर्मात जी चार ऋणे सांगितली आहेत, त्यातील पितृ ऋण फेडण्यासाठी संततीची आवश्यकता असते. ते केवळ विवाहाच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकते. धर्माचे योग्य पालन होऊ शकते. सध्याच्या भरकटलेल्या युवा पिढीला समलैंगिकतेच्या माध्यमातून दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाने या अनैसर्गिक आणि चुकीच्या गोष्टींविरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे, असेही शरण म्हणाल्या.
(हेही वाचा अमेरिकेत Same-Sex Marriage bill मंजूर; विधेयकाच्या बाजूनं मतदान, जो बायडेन म्हणाले…)
Join Our WhatsApp Community