राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या वेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर (Nilofer) या देखील सोबत होत्या. त्यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Sameer Khan Accident)
(हेही वाचा – Lebanon Pager Explosion : लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू)
कसा घडला अपघात?
समीर खान आणि त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले होते. यानंतर समीर यांनी चालकाला गाडी घेऊन येण्यास सांगितले. या वेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान हे मल्टिफॅक्टर झाले आहेत. मुंबईतील कुर्ला भागात हा अपघात झाला.
त्यात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसंच त्यांच्या चेहऱ्यालाही इजा झाली. कार चालकाने गाडीचा अॅक्सिलेटर दाबला त्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांच्यावर धडकली त्यांना कारने फरफटत नेले. एचडीआयएल वसाहतीच्या भिंतीवर आदळली. या प्रकरणात कार चालक अबुल अन्यारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे काही दुचाकीही चिरडल्या गेल्या आहेत. विनोबा भावे पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. (Sameer Khan Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community