भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) माजी विभागीय संचालकांना बांगलादेशातून ‘धार्मिक धर्मांधांकडून’ धमक्या मिळाल्या, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी (११ ऑक्टोबर) सांगितले.
अधिक माहितीनुसार, सध्या चेन्नईमध्ये तैनात असलेल्या वानखेडे (Sameer Wankhede) यांना सोमवारी (९ ऑक्टोबर) दुपारी सोशल मीडियावरून धमकी मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि गोरेगाव पोलिस स्टेशनला एक ईमेल पाठवून तक्रार नन्दावली. तेव्हापासून मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
(हेही वाचा – Khalistani Terrorist : इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी दहशतवादी पन्नूनची भारताला धमकी; व्हिडीओ वायरल)
समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया
याबाबत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की; “आपल्या फोनवर एक धमकीचा मेसेज आला. आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्या केसमध्ये असलेल्या सहभागाबद्दल सांगत, अज्ञात व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असे वानखेडे यांनी नमूद केले. मुस्लिम नागरिक आणि त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आमच्या गटाकडून तुम्हाला जीवे मारण्यात येईल, असा दावाही त्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. समीर वानखेडे हे सध्या चेन्नई येथे ड्युटीवर असून, (धमकीचा) हा मेसेज बांगलादेशमधील राजाशाही या शहरातून आल्याचा खुलासा त्यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community