कार्डेलिया क्रूझवर बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि अन्य तिघांविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर सीबीआय कडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करत त्यांच्या घराची, आणि अन्य ठिकाणांची झड़ती घेण्यात आली.
(हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल)
त्यांनतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सीबीआय कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयची कारवाई कोणत्या आधारावर सुरू आहे? माझ्या घरी सर्च ऑपरेशन का केले? असा प्रश्न करत माझ्यावर अन्याय होत असल्याचे वानखेडे यांनी याचिकेतून म्हटले होते. त्या याचिकेवर सुनावणी करतांना दिल्ली हायकोर्टाने सीबीआयला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Today Delhi High Court granted protection from arrest (No coercive action) till May 22 to former Zonal Director, NCB Mumbai Sameer Wankhede with liberty to approach the Bombay High Court for further relief.
Wankhede moved Delhi HC seeking cross FIR against Deputy DG NCB… pic.twitter.com/1mHgZHWFWw
— ANI (@ANI) May 17, 2023
त्यानुसार, समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तसेच सीबीआयला समीर वानखेडे यांना २२ मे पर्यंत अटक करता येणार नाही. त्याशिवाय, कायमस्वरुपी दिलासा मिळवण्यासाठी वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागावी असे निर्देशही दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.
हेही पहा –
दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिलासा देताना गुरुवार १८ मे रोजी होणारी सीबीआय चौकशी रोखली आहे. सीबीआयला आता २२ मेपर्यंत समीर वानखेडे यांना अटक करता येणार नाही. तर, तूर्तास कठोर कारवाईपासून देखील संरक्षण देण्यास सीबीआयने कोर्टात सहमती दर्शवली आहे.
Join Our WhatsApp Community