एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांवर 1.2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. याप्रकरणी आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर देखील नवाब मलिकांनी 28 डिसेंबर, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या रोजी त्यांच्या कुटुंबावर आपत्तीजनक विधान केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारे वानखेडेंवर टिप्पणी करु नये, असा आदेश दिला आहे, असे वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
(हेही वाचा काँग्रेसकडून गोव्याची प्रतिमा मलीन, टीएमसी हिंदू विरोधी, आप खोटारडी!)
याआधीही केलेली तक्रार
याआधी 4 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध बदनामीच्या दाव्यात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. न्यायमूर्ती एस.जे. काथावाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. काही दिवसांपूर्वी मलिक यांनी सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदेच्या दरम्यान केलेल्या वक्तव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफीही मागितली होती.
Join Our WhatsApp Community