समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात (Samruddhi Expressway Accident) होत आहे. महामार्गावरील अतिवेगाने वाहने चालवली जात असल्याने या ठिकाणी गंभीर अपघात होत आहेत. असाच गंभीर अपघात शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी झाला. साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील भाविकांच्या कारचा शुक्रवारी, रात्री 9.30 वाजता वैजापूरजवळ भीषण अपघात झाला. यात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.
(हेही वाचा : Uttarakhand UCC : समान नागरी कायद्याच्या विरोधात उत्तराखंडात ‘शाहीन बाग’ची पुनरावृत्ती होणार?)
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
जाफराबाद तालुक्यातील हलके तपोवन येथील 5 जण कारमधून रात्रीच्या वेळी शिर्डी येथे साई दर्शनाला जात होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी कंटेनरवर पाठीमागून धडकली (Samruddhi Expressway Accident). सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिकांनी गंभीर जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथून दोघांना छत्रपती संभाजीनगरला, तिघांना कोपरगावला हलवण्यात आले होते. यात तिघांचा मृत्यू झाला. उमेश उगले, राहुलराज भोज व भाऊसाहेब पैठणे या तिघांचा मृत्यू झाला. तर रवींद्र मन्सूरराव फलके आणि वाघ यांच्यासह अन्य एक प्रवासी जखमी झाले आहेत. करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community