Samriddhi Highway Accident : ‘त्या’ अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा

129
Samriddhi Highway Accident : 'त्या' अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातात (Samriddhi Highway Accident) वाढ होतांना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन १० ते १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway Accident) जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात १० ते १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील होते.

(हेही वाचा – Monsoon Update : पुढील ४८ तासांत राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज)

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडून मदत जाहीर

या अपघाताबद्दल (Samriddhi Highway Accident) कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला, आणि या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली. तर जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश देखील प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीदेखील या घटनेवर शोक व्यक्त करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

अपघाताच्या अधिक माहितीनुसार, या बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. हा अपघात (Samriddhi Highway Accident) १५ ऑक्टोबर रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू झाले. (Samriddhi Highway Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.