समृद्धी महामार्गाच्या सुसाट प्रवासासाठी नेमका किती टोल भरावा लागणार? जाणून घ्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटरच्या मार्गावर प्रवाशांना अनेक सोयीसुविधा मिळणार आहेत. या महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर नागरिकांना ७०१ किलोमीटरचे अंतर वेगाने पूर्ण करता येईल. या वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

असे असतील दर 

समृद्धी महामार्गावर टोलच्या माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. या बोर्डवर सर्व प्रकारांच्या वाहनांसाठी किती टोल लागेल याची माहिती दिली आहे. मोटर, जीप, व्हॅन हलक्या मोटर वाहनांसाठी १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तर हलकी व्यावसायिक वाहने, मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी २.७९ रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. बस, ट्रकसाठी ५.८५ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तसेच अतिअवजड वाहनांसाठी ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. समृद्धी महामार्गावर हे टोलचे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत म्हणजेच पुढील ३ वर्षांसाठी लागू राहतील.

सध्या मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी जवळपास १४ तास लागतात परंतु समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यावर हे अंतर ८ तासात कापणे शक्य होणार आहे.

या जिल्ह्यांमधून जाणार समृद्धी महामार्ग

या १२ जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here