मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग सुरु होण्याआधीच महामार्गाच्या मागे संकटे सुरु झाली आहेत. कारण या महामार्गाच्या उद्घाटनाच्या आधीच महामार्गाची कमान कोसळली. त्यामुळे महामार्गाचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत.
पुढील पाच-सहा दिवसांत ते काम पूर्ण होणे अशक्य
या अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या दुर्घटनेमुळे उद्घाटन सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एक सोळाव्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळला आहे. यामुळे हे काम पुढील पाच-सहा दिवसांत ते काम पूर्ण होणे अशक्य आहे. तसेच तज्ज्ञांनी आता वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचे सुचविले आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. यावरून राजकारणही सुरु झाले होते. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची हवाई पाहणीही केली होती. समृद्धी महामार्गाचे काम नागपूर जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. लोकार्पणाच्यापूर्वीच वाहनेही धावू लागली आहेत.
(हेही वाचा सोमय्यांवरील हल्ल्याची एफआयआर खोटी! )
Join Our WhatsApp Community