मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गामुळे वाहतुकीला चांगलीच गती मिळाली आहे.मात्र समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांची संख्या ही राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरत चालली आहे. यावर विविध प्रकारच्या उपाययोजना करुनही अपघात आटोक्यात आणणे कठीण जात आहे.सातत्याने होणारे हे अपघात रोखण्यासाठी MSRDC ने AI प्रणालीचा कसा वापर केला जाणार आहे. याचा कसा वापर केला जाणार आहे ते जाणून घेऊ. (Intelligent Transportation System )
राज्यातील हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. समृद्धी महामार्गामुळे वाहतूक सोपी झाली आहे. मात्र या मार्गावर मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे होते. त्यासाठी MSRDC ने पाऊल उचलेले आहे.
इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम चा करणार वापर
समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाईल. MSRDC कडून संपूर्ण७०१ किमी लांबीच्या महामार्गावर इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम (ITS) बसविण्यात येणार असून यासाठी कंपनीचा शोध सुरू केला आहे.
(हेही वाचा : Mumbai Police : ६०० कंत्राटी पोलीस शिपाई मुंबई पोलीस दलात दाखल, लवकरच दुसरा टप्पा पार पडणार)
सीसीटीव्ही ठेवणार नियंत्रण
समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रणकक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.
दंड आकारणे सोपे
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायवेवर वेगाने जाणारी, लेन क्रॉसिंग आणि ओव्हरटेकिंग करणारी वाहने ओळखणे खूप सोपे होणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नियम मोडणारी वाहने कमी वेळात ओळखून थांबवणे आणि दंड आकारणे शक्य होणार आहे.
वाहनांची ओळख पटविणे शक्य
समृद्धी महामार्गावर सध्या क्विक रिस्पॉन्स व्हेईकल, आरटीओ आणि हायवे पोलिसांच्या मदतीने लक्ष ठेवले जात आहे. आयटीएस बसवल्यानंतर नियंत्रण कक्षात बसून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची ओळख पटवली जाईल. अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत देण्यासाठी देखील याचा वापर केला जाणार आहे.
दररोज 15 ते 20 हजार प्रवासी करतात प्रवास
मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. 701 पैकी 600 किलोमीटरचा मार्ग वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. नागपूर ते भरवीर दरम्यानच्या मोकळ्या महामार्गावरून दररोज 15 ते 20 हजार प्रवासी ये-जा करतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community