समृद्धी महामार्गावर कोणत्या वाहनांसाठी किती असणार टोल? बघा 2031 पर्यंतच्या Toll Rate ची यादी

279

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याचे ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. या समृद्धी महामार्गावर प्रवास करताना नेमका किती टोल भरावा लागणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे. हा पहिला टप्पा ५२० किमीचा असून या प्रवासादरम्यान एकूण १८ टोलनाके असतील. या टोल नाक्यांवरील टोलची यादी जाहीर झाली असून २०३१ पर्यंत हलक्या वाहनांपासून ते अवजड वाहनांना किती टोल आकारला जाणार जाणून घ्या…

(हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्यरेल्वे ‘या’ विशेष गाड्यांची वाढवणार मुदत)

टोलच्या दराबाबत काढलेल्या परिपत्रकात ११ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतचे दर आणि त्यानंतर पुढील प्रत्येक तीन वर्षांनी होणारी वाढ देण्यात आली असून दहा वर्षांपर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. चार टप्प्यांतील टोलवाढीचा आखेरचा टप्पा हा १ एप्रिल २०३१ ते १० डिसेंबर २०३२ पर्यंतचा असणार आहे.

असे असणार २०३१ पर्यंत टोलचे दर

chart

 

 

या वाहनांची टोल भरण्यापासून सुटका

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभा सभापती, राज्यसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कराची वाहने, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेना दलाची, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका या वाहनांना समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना टोलपासून सुटका मिळणार आहे.

या ठिकाणी असणार टोल नाके

वायफळ, सेलडोह वडगाव बक्षी, येळकेली, विरूल, धामणगाव (आसेगाव), गावनेर तळेगाव (शिवनी), कारंजा लाड, शेलू बाजार/ वनोजा, मालेगाव, मेहकर, दुसरबीड, सिंदखेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव-जांबरगाव, कोकमठान

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.