मागील देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम आता लवकरच पूर्ण होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
फडणवीस यांची घोषणा
एमएसआरडीसी(महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ)कडून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता वेगाने पूर्ण करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या महामार्गाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
(हेही वाचाः समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल? वाचा दर)
उद्घाटन लांबणीवर
या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 2 मे रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येमार होते. पण उद्घाटनाआधीच या महामार्गाची कमान कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याने त्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. मुंबई ते शेलू बाजार असा हा 210 किमी.चा समृद्धी महामार्गाचा टप्पा असणार आहे.
एकूण 8 टोलनाके
या पहिल्या टप्प्यात एकूण 8 टोलनाके बसवण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवर कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या हलक्या मोटार वाहनांना प्रतिकिमी 1.73 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहनचालकांना 365 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.
Join Our WhatsApp Community