- ऋजुता लुकतुके
सॅमसंगच्या गॅलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रमात बुधवारी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ (Samsung Galaxy Z Fold 6) फोनचं अनावरण जगभरात करण्यात आलं आहे. सॅमसमगचा हा वार्षिक कार्यक्रम जगभरातच उत्सुकतेचा विषय असतो. कारण, काही ना काही नवीन टेक अपडेट कंपनीकडे असतो. यावेळी कंपनीने सॅमसंग रिंग लोकांपर्यंत आणली आहे. यात आरोग्यविषयक अनेक महत्त्वाचे अपडेट आहेत. तिचे फिचर्स, स्पेसिफिकेशन येत्या काही दिवसांतच आपल्यापर्यंत पोहोचतील. पण, त्याचवेळी कंपनीच्या फोल्डेबल फोनबद्दल आपल्याला बरीच माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. ती जाणून घेऊया. (Samsung Galaxy Z Fold 6)
(हेही वाचा- India-Taiwan Deal : भारत आणि तैवान दरम्यान सेंद्रीय उत्पादनांसाठी परस्पर मान्यता करार)
सॅमसंगचा फोल्डेबल फोन हा या श्रेणीतील पहिला आधुनिक फोन आहे. प्रत्येक अपडेटमध्ये ते नवीन फिचर त्यात आणत असतात. आताही नवा झेड फोल्ड ६ फोन आधीपेक्षा मोठा पण, वजनाने कमी आहे. या फोनचा डिस्प्ले आहे आधीपेक्षा मोठा म्हणजे ७.६ इंचांचा. २१६० बाय १८५६ चा डायनामिक एमोल्ड डिस्प्ले या फोनमध्ये आहे. अँड्रॉईड १४ प्रणालीवर हा फोन चालेल. (Samsung Galaxy Z Fold 6)
Samsung Galaxy Z Fold 6 launching tomorrow
📱 7.6″ 2160×1856 Dynamic AMOLED 2X inner display, 4MP under display
📏5.6mm
📱 6.3″ Dynamic AMOLED 2X outer display,10MP
📏 12.1mm
🦾Snapdragon 8 Gen3
🍭A14
📸 50MP OIS+ 12MP UW+ 10MP 3X optical zoom
🔋4400mAh
📶 WiFi 6,5#GalaxyZFold6… pic.twitter.com/Bski3mdhTm— yogesh yadav (@yogeshyaa) July 9, 2024
झेड फोल्डमध्ये स्नॅपड्रॅगन तिसऱ्या पिढीचा प्रोसेसर असेल. फोल्ड केलेल्या फोनची जाडी १२.१ मिमीची असेल तर उघडलेला फोन ४.५ मिनींचा असेल. या फोनचं एकूण वजन २३९ ग्रॅमचं असेल. फोनमधील प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्स १२ मेगापिक्सेल आणि ऑप्टिकल झूम लेन्स १० मेगापिक्सेलची असेल. (Samsung Galaxy Z Fold 6)
(हेही वाचा- Mumbai-Goa Highway वर तीन दिवसांचा ब्लॉक)
नेहमीप्रमाणे फोनबरोबर एस पेनही असेल. भारतात या फोनची किंमत १,५९,९९० रुपयांपासून सुरू होईल. (Samsung Galaxy Z Fold 6)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community