Samyukta Maharashtra Sangharsha Memorial Park : संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यानाला मिळणार नवीन झळाळी

परळमधील बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यानातील कारंजे नादुरुस्त झाले असून काही सीसी टिव्ही कॅमेराही बंद पडलेले आहेत. त्यामुळे या उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत उद्यानाचे नुतनीकरण करतानाच आकर्षक विद्युत खांब बसवून रोषणाईही केली जाणार आहे.

683
BMC : महापालिकेच्या उपायुक्ताला सेवानिवृत्ती ऐवजी एक वर्षांची वाढ?

परळमधील बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यानातील कारंजे नादुरुस्त झाले असून काही सीसी टिव्ही कॅमेराही बंद पडलेले आहेत. त्यामुळे या उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत उद्यानाचे नुतनीकरण करतानाच आकर्षक विद्युत खांब बसवून रोषणाईही केली जाणार आहे. (Samyukta Maharashtra Sangharsha Memorial Park)

सन २०१७ मध्ये झाले होते नुतनीकरण

परळ भोईवाडा परिसरात सुमारे ९ एकर परिसरात बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यान बनवण्यात आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये लोकार्पण झालेल्या या उद्यानात ११५० मीटरर्स सायकल ट्रॅकचे सुशोभीकरणासह नुतनीकरण करण्यात आले होते. या मनोरंजन मैदानाचा विकास करताना त्यामध्ये कारंज्यांसह सीसी टिव्ही बसवण्यात आले होते. तसेच या मनोरंजन मैदानावर पथदिवे बसले होते. परंतु सध्या या उद्यानातील पथदिवे आणि खांब खराब झालेले आहेत. त्यामुळे याचा प्रकाश संपूर्ण विभागात पडत नाही. तसेच यामधील ८ लहान कारंजे आणि एक मुख्य कारंजा बसवण्यात आलेले आहेत, तेही सध्या बंद आहेत. या कारंज्याचे नोझल्स व पाण्याचे पंप खराब झालेले आहे, तसेच सीसी टिव्हीही बंद आहेत. त्यामुळे या उद्यानाचे नुतनीकरण करताना यातील सीसीटिव्ही कॅमेरा, कारंजे तसेच पथदिवे नव्याने बसवण्याचा निर्णय घेतला आहे. (Samyukta Maharashtra Sangharsha Memorial Park)

(हेही वाचा – Maratha Reservation Survey : कितीही कर्मचारी नेमा पण मराठा सर्वेक्षण आठ दिवसांत पूर्ण करा…)

तब्बल ९ कोटींचा होणार खर्च

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे ऐतिहासिक उद्याने असून अनेक उच्चभ्रु व्यक्ती याठिकाणी भेट देण्यास येत असतात. तसेच स्थानिकांकडूनही याचा वापर केला जातो. त्यामुळे या उद्यानाचे नुतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी एल्प्रोज इंजिनिअर्स यांची निवड करण्यात आल आहे. (Samyukta Maharashtra Sangharsha Memorial Park)

अशाप्रकारे केली जाणार नुतनीकरणामध्ये कामे
  • अॅल्युमिनियम कास्टिंग असलेल्या ९ मीटर उंचीचे १२ विद्युत खांब हेरिटेज प्रकारच्या सजावटीत एलईडी फिटिंगसहित बसवणार.
  • अॅल्युमिनियम कास्टिंग असलेल्या ७ मीटर उंचीचे ०४ विद्युत खांब हेरिटेज प्रकारच्या सजावटीत एलईडी फिटिंगसहित बसवणार.
  • अॅल्युमिनियम कास्टिंग असलेल्या ५ मीटर उंचीचे १६ विद्युत खांब हेरिटेज प्रकारच्या सजावटीत एलईडी फिटिंगसहित बसवणार.
  • जुन्या १३७ विद्युत खांबाचे हेरिटेज प्रकारच्या सजावटीत एलईडी फिटिंगसहित नूतनीकरण.
  • लहान ०८ व एक मुख्य कारंजांचे काम, नोझल व इतर आवश्यक कामासाहित.
  • सर्व कारंजावर लाईटींग चे काम आणि १ मुख्य कारंजावर डिजिटल लाईट बार.
  • एलईडी मॉनिटरसह ७० सीसीटिव्ही कॅमेरा बसवणे. (Samyukta Maharashtra Sangharsha Memorial Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.