‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे. गेल्या २५ वर्षांत ‘सनातन प्रभात’ने जे पाहिले, ते जगाला पहायला वेळ लागला. ‘हिंदु राष्ट्रा’सारखा विषय ‘सनातन प्रभात’ने आधीच हाताळलेला होता; पण जग आज हिंदु राष्ट्राविषयी सांगत आहे. मालेगाव बाँबस्फोटामागील सत्य हा विषयही ‘सनातन प्रभात’नेच (Sanatan Prabhat) प्रथम मांडला. काळाच्या पुढे जाऊन सूत्रे मांडण्यात ‘सनातन प्रभात’ अग्रेसर आहे. असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) यांनी केले. २२ मार्च या दिवशी माटुंगा (प.) येथील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे ‘दैनिक सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘सनातन प्रभात’च्या (Sanatan Prabhat) ज्येष्ठ उपसंपादिका रुपाली अभय वर्तक (Rupali Abhay Vartak) यांनी सुद्धा यावेळी संबोधित केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (Dr. Jayant Athavale) यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दिलेल्या शुभसंदेशाचे वाचन दैनिक ‘सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर प्रीतम नाचणकर यांनी यावेळी केले. सनातन प्रभातच्या (Sanatan Prabhat) युट्यूब वाहिनीवरून या सोहळ्याचे ‘लाईव्ह प्रसारण’ करण्यात आले.
(हेही वाचा – Tirumala Temple मध्ये आता हिंदूच कर्मचारी असणार; आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे विधान)
या कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाला. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या अंकाचे प्रकाशन वक्त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ‘सनातन प्रभात’ची वैशिष्टये सांगणारा विडिओ दाखवण्यात आला. ‘सनातन प्रभात’च्या काही कृतिशील वाचकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ‘सनातन प्रभात’चे (Sanatan Prabhat) प्रदर्शन कक्ष, विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही याचा उपस्थितांनी लाभ घेतला.
‘सनातन प्रभात’चे (Sanatan Prabhat) नाव हिंदु राष्ट्र निर्मितीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल ! – रुपाली वर्तक, ज्येष्ठ उपसंपादिका, ‘सनातन प्रभात’
प्रचलित माध्यमक्षेत्रात कुठेही न आढळणारी अनेक वैशिष्ट्ये तत्त्वनिष्ठपणे जपत ‘सनातन प्रभात’ने (Sanatan Prabhat) आतापर्यंत अनेक राष्ट्र-धर्म विषयक दृष्टीकोन बीजरूपाने रुजवले आणि नंतरच्या काळात त्याचे चळवळी आणि आंदोलने यांच्या स्वरूपात परिवर्तन झाले. अतिशय परखड आणि निर्भीडपणे योग्य ते दृष्टीकोन देऊन ‘सनातन प्रभात’ सध्याच्या ‘डीप स्टेट’चे षड्यंत्र ध्वस्त करत आहे. हिंदु इकोसिस्टमचा भाग करून घेणार्या ‘सनातन प्रभात’चे (Sanatan Prabhat) नाव हिंदु राष्ट्र निर्मितीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल, यात शंकाच नाही. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सनातन प्रभातचे वाचक, वितरक, हितचिंतक, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ आदी सर्वांप्रती कृतज्ञताभावाने आम्ही आभार व्यक्त करतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community