Om Certificate : गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘ओम प्रमाणपत्र’ वितरणाच्या व्यापक चळवळीस सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद !

‘हिंदु धर्मशास्त्रानुसार, देवाला अर्पण करण्यात येणारा प्रसाद आणि पूजा साहित्य जेवढे सात्त्विक असेल, तेवढा पूजकाला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. शुद्ध आणि सात्त्विक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अन्‌ त्याचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ कडून राबवण्यात येणारी ही चळवळ अत्यंत कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद्गार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काढले.

264
‘भाविकांना देवतेला अर्पण करण्यासाठी मिळणारा प्रसाद आणि पूजा साहित्य शुद्ध अन् पूजेचे पावित्र्य राखणारे असावे’, यासाठी रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने ‘ओम प्रतिष्ठान’च्या वतीने चळवळ राबवण्यात येत आहे. गणेश चतुर्थी, नवरात्री आदि उत्सव केवळ पर्यावरणपूरक नसावेत, तर त्यांमध्ये सात्त्विकता आणि शुद्धता ही असावी, या दृष्टीने ही चळवळ आरंभ करण्यात आली आहे. यात प्रसाद शुध्द आणि धर्मात सांगितलेले वर्ज्य पदार्थ टाळून बनवलेला असल्याची खात्री या ओम प्रमाणपत्राच्या (Om Certificate) माध्यमातून करता येणार आहे. या  ‘ओम प्रमाणपत्र’ वितरणाचा शुभारंभ हरितालिकाच्या मंगलमय दिवशी ६ सप्टेंबर २०२४ रोजी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रमाणपत्रास हस्तस्पर्श करून ते प्रमाणपत्र रामनाथी आश्रमातील ‘सनातन प्रसाद निर्मिती केंद्र’ यांस प्रदान केले.
‘हिंदु धर्मशास्त्रानुसार, देवाला अर्पण करण्यात येणारा प्रसाद आणि पूजा साहित्य जेवढे सात्त्विक असेल, तेवढा पूजकाला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. शुद्ध आणि सात्त्विक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अन्‌ त्याचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ कडून राबवण्यात येणारी ही चळवळ अत्यंत कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद्गार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या प्रसंगी काढले. पूजकाने त्या-त्या देवतेचा नामजप करत पूजा-अर्चना केल्यास त्याची शुद्धता आणि सात्त्विकता अधिक प्रमाणात वाढेल. त्यामुळे वातावरणातील सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होईल. परिणामी ही चळवळ अधिक फलदायी होईल’, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा Hijab बंदी करणार्‍या प्राचार्यांचा ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ काँग्रेस सरकारकडून स्थगित)

‘हिंदु शुद्धता मानक प्रमाणित’ (ओम प्रमाणित) दुकानातून प्रसाद आणि पूजा साहित्य खरेदी करण्याचे आवाहन ‘ओम प्रतिष्ठान’ आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी १४ जून २०२४ या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे केले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज या उपक्रमाचा व्यापक शुभारंभ करण्यात आला. (Om Certificate)

ओम प्रमाणपत्राचा उद्देश

‘ओम प्रमाणपत्र’ (Om Certificate) ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्या अस्तित्वासाठी राबवण्यात आलेली चळवळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेल्या या चळवळीतून ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली आहे. असे असले, तरी हे प्रतिष्ठान सर्वत्रच्या हिंदूंसाठी आहे. ‘प्रसादातील साम्रगी पूर्णतः शुद्ध साम्रगी आहे कि नाही ?’, हे ‘ओम प्रमाणपत्र’ (Om Certificate) देण्यापूर्वी प्रथम पाहिले जाईल.

हिंदु दुकानदारांच्या सक्षमीकरणासाठी ‘ओम प्रमाणपत्र’

देशभरातील दुकानदारांना ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ (Om Certificate) दिले जात आहे. हिंदु विक्रेत्यांकडून विक्री केले जाणारे उत्पादन, हे हिंदूंनीच शुद्धतेचे पालन करून बनवलेले आहे ना, याचीही खात्री केली जाणार आहे. ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ हा काही पैसे कमावण्यासाठी चालू केलेला व्यवसाय नाही किंवा शासकीय यंत्रणेला आव्हान देण्याचाही प्रयत्न नाही. हा हिंदूंच्याच सक्षमीकरणासाठी केलेला प्रयत्न आहे.

‘ओम प्रमाणपत्रा’च्या साहाय्याने शुद्धता मानक प्रमाणित दुकानांची नावे कशी शोधावी?

‘ओम शुद्धता प्रमाणपत्रा’वर एक ‘क्यू.आर्. कोड’ असेल. तो भ्रमणभाषद्वारे स्कॅन केल्यावर, ओम शुद्धता प्रमाणपत्र (Om Certificate) घेतलेल्या केंद्राचे नाव आपल्याला दिसेल. ते नाव आणि प्रत्यक्ष केंद्रावरचे नाव एकच असल्याचे पडताळून पहावे. ते एकच असेल, तर आपण योग्य ठिकाणी असल्याचे आपल्या लक्षात येईल. जर ‘क्यू.आर्. कोड’  स्कॅन केल्यानंतर दिसणारे नाव आणि केंद्राचे नाव एक नसेल तर ते प्रमाणपत्र अवैध आहे, हे आपल्या लक्षात येईल. अशावेळी तिथे खरेदी न करता,  आपल्याला त्याची तक्रारही नोंदवायची आहे आणि अन्य शुद्धता मानक प्रमाणित दुकानातून खरेदी करायची आहे. हिंदूंच्या व्यवसायवृद्धीसाठी ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन ओम प्रतिष्ठानने केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.