
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी, गोवा येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले. (Sanatan Sanstha)
(हेही वाचा – हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही; Raj Thackeray यांची भूमिका)
या वेळी मुख्यमंत्र्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन केले, तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, तसेच नारायण नाडकर्णी, मधुसूदन कुलकर्णी आणि अधिवक्ता राजेश गावकर असे उपस्थित होते. (Sanatan Sanstha)
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माने सांगितला सिडनी टेस्टमधून स्वत:ला वगळण्याचा घटनाक्रम)
या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताना भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय; सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती; सांस्कृतिक कार्यक्रम; लोककला आदींची चित्रे प्रातिनिधिक चित्रे ठेवण्यात आली आहेत. पुढे कार्यक्रमाच्या दृष्टीने वेळोवेळी अधिकची माहिती या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवासाठी धर्मदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Sanatan Sanstha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community