गोवा राज्यात स्थापन झालेल्या आणि सध्या संपूर्ण भारतात सनातन हिंदू धर्माचा तेजस्वी प्रचार करणार्या सनातन संस्थेचा (Sanatan Sanstha) रौप्य महोत्सवी सोहळा ३० नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते केला जाणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
(हेही वाचा – Child marriage : देशात पाचपैकी एका मुलीचा बालविवाह; ‘या’ सात राज्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक)
सनातन संस्थेचे (Sanatan Sanstha) संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ यांचीही या कार्यक्रमाला वंदनीय उपस्थिती सोहळ्याला असणार आहे. या कार्यक्रमात अमृत महोत्सवी सन्मानानिमित्त प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे होणारे मार्गदर्शन म्हणजे गोमंतकियांसाठी अमूल्य पर्वणीच आहे. या अमूल्य अशा क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी गोमंतकियांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला ‘गीता परिवार’चे महासचिव सुभाष नाईक आणि ‘सनातन संस्थे’च्या शुभा सावंत यांचीही उपस्थिती होती.
(हेही वाचा – Raj Thackeray यांची पराभूत उमेदवारांसोबत बैठक; काय झाली चर्चा ?)
सनातन संस्थेच्या (Sanatan Sanstha) रौप्य महोत्सवाविषयी अधिक माहिती देतांना राजहंस पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. सनातन संस्थेची २५ वर्षे म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची २५ वर्षे आहेत. सनातन धर्मातील अध्यात्म हे विज्ञान म्हणून अर्थात् ‘अध्यात्मशास्त्र’ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सनातन संस्थेने मोठे कार्य केले. अध्यात्मशास्त्रावरील सनातनची ग्रंथसंपदा आणि सनातन शिकवत असलेली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ यांमुळे आज १२२ साधक संत झाले असून १ हजारांहून अधिक साधकांचा प्रवास संतत्वाच्या दिशेने होत आहे. सनातन संस्थेच्या (Sanatan Sanstha) मार्गदर्शनामुळे हजारो लोक आज तणावमुक्त, व्यसनमुक्त आणि आनंदी जीवन जगत आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेने समाजातील सर्व घटकांसाठी निशुल्क तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवनासाठी कार्यशाळा आयोजित केल्या. अशा सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सव म्हणजे दुग्धशर्करायोगच आहे.’’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community