
२५ वर्षांपूर्वी हिंदु शब्दही उच्चारणे अत्यंत कठीण होते; त्या काळात गोव्यात स्थापन झालेल्या सनातन संस्थेच्या संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा संकल्प नुसता हाती घेतला नाही, तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अनेक संकटे झेलत हिंदु राष्ट्राची जागृती संपूर्ण देशभरात केली. यामागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तपोबल आहे. आज हिंदु राष्ट्र येणार याची सर्वांना खात्री झाली असून ते हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होणार होण्याची वेळ जवळ आली आहे. हिंदु राष्ट्र लवकरच साकार होईल, असे गौरवोद्गार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी काढले. ते रामराज्याचे ध्येय उराशी बाळगणार्या ‘सनातन संस्थे’चा रौप्य महोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. (Swami Govind Giri Maharaj)
सुकुर पंचायत सभागृह गोवा येथे ‘सनातन संस्थे’चा रौप्य महोत्सव सोहळा ३० नोव्हेंबर या दिवशी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याच्या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, गोव्यातील आमदार चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार उल्हास तुयेकर आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस हे मान्यवर उपस्थित होते. यांसह या सोहळ्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. (Swami Govind Giri Maharaj)
(हेही वाचा – गोव्याचे मुख्यमंत्री Dr. Pramod Sawant यांचा ई-मेल हॅक)
गोवा सरकार देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्यासाठी कटीबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
देवाला महत्त्व दिले, तर धर्म जागृत राहिल आणि धर्म जागृत राहिला तर देश जागृत राहिल. यासाठी गोवा सरकार देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्यासाठी कटीबद्ध आहे. सनातन संस्थेने कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन आज देशभरात भरीव असे कार्य केले आहे. सनातन संस्थेचा गोव्यातील रामनाथी येथील आश्रमातून हिंदु धर्माचे रक्षणाचे महत्त्वाचे कार्य चालते. सनातन संस्थेचा ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक हिंदूंवर देश आणि विदेशात होत असलेल्या अत्याचार, तसेच हिंदू करत असलेले चांगले कार्य याची निरंतर माहिती देऊन हिंदुत्वाच्या जागृतीचे कार्य करत आहे. प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या सारख्या अनेक राष्ट्रसंतांमुळे भारतात देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्य चालत आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रसंगी सांगितले. (Swami Govind Giri Maharaj)
सनातन संस्थेच्या कार्यामुळे हजारो लोक तणावमुक्त आणि व्यसनमुक्त बनले ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री
प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांनी महर्षि वशिष्टाप्रमाणे अखंड असे धर्मरक्षणाचे कार्य केले आहे. महाराजांची साधना आणि कार्य यांमुळे असंख्य जिवांच्या जीवनात चांगले पालट होऊन आज राष्ट्रभक्त निर्माण होत आहेत. सनातन संस्थेने हिंदु धर्माचे पुनर्स्थापनेचे विलक्षण असे कार्य केले आहे. या कार्यामुळे हजारो लोक तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगू लागले आहेत. सनातनच्या कार्यामुळे धर्म आणि अध्यात्म यांचे रक्षण झालेले आहे, असे उद्गार केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. (Swami Govind Giri Maharaj)
गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, सनातन संस्था ही सनातन धर्माचे रक्षण आणि मानवी मूल्यांचे रक्षण करण्याचे महान आणि पवित्र असे कार्य करत आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी धर्मरक्षणाच्या कार्यालाही हातभार लावला पाहिजे. गोव्याची ओळख पूर्ण ‘सन, सँड आणि सी’ (समुद्र किनारे) अशी होती. पर्यटन खात्याने गोव्याची ही ओळख पालटण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटन खात्याने ‘एकादश तीर्थ’ योजना कार्यान्वित करून गोव्यात १०० वर्षे जुनी आणि प्रसिद्ध मंदिरे या योजनेखाली आणली. गोवा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराची पुर्नर्बांधणी केली. (Swami Govind Giri Maharaj)
या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, सनातन संस्था हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेल्या २५ वर्षांच्या काळात जिहादी, कम्युनिस्ट, अर्बन नक्षलवादी आदींचा प्रखर विरोध सहन करून अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो. सनातन संस्था एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रसिद्ध झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय सिद्ध करत असलेल्या ‘सी.ए.ए.’ कायद्याच्या प्रक्रियेत सनातन संस्थेचा सहभाग होता आणि यामुळे कायद्याची व्याप्ती बांगलादेशीपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले. वक्फ संशोधन विधेयक सिद्ध करण्याच्या प्रक्रियेतही सनातन संस्थेने उल्लेखनीय सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी महाराष्ट्राप्रमाणे गोवा राज्यानेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याची मागणी केली. सर्व राज्यांनी जर गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यास गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाल्याशिवाय रहाणार नाही, असेही त्यांनी म्हटले. (Swami Govind Giri Maharaj)
या सोहळ्याचा आरंभ दीपप्रज्वलन, तसेच वेदमंत्रपठणाने सोहळ्याला प्रारंभ झाला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रारंभी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण करण्यात आले आणि यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यासह सनातन संस्थेच्या वतीनेही प.पू. स्वामीजींचा हृदय सन्मान सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी केला. या मंगल प्रसंगी गोव्यातील गीता परिवाराच्या वतीनेही प.पू. स्वामीजींचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी तपोभूमी कुंडई येथील पीठाधिश्वर ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांचा आशिर्वचनपर व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. (Swami Govind Giri Maharaj)
सनातन संस्था निर्मित ‘ई-बुक’ चे प्रकाशन !
या वेळी प.पू. स्वामीजींच्या हस्ते ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन, सनातन संस्था निर्मित ‘कुंभपर्व माहात्म्य’ या मराठी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन आणि ‘सनातन आश्रम दर्शन’ या व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले. सोहळ्यात सूत्रसंचालन चैतन्य तागडे यांनी, तर आभारप्रदर्शन सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी केले. (Swami Govind Giri Maharaj)
Join Our WhatsApp Community