जाफराबाद तालुक्यातील (Jalna) पासोडी चांडोळ गावात रोडवर पुलाचे बांधण्याचे काम सुरू आहे. कामासाठी सिल्लोड (Sillod) तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर या कामासाठी आलेले होते. पुलाचा बाजूलाच मजुरांना रहाण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आलेले होते. २१ फेब्रुवारीच्या रात्री टिप्परमधून आणलेली रेती या शेडवरच टाकल्यामुळे त्याखाली दबून ५ मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
(हेही वाचा – Shri Krishna Janmabhoomi साठी आता ऑस्ट्रेलियातून राबवणार चळवळ; भव्य परिसंवादातून सुरु होणार मोहीम)
पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर काळाने झोपेतच झडप घातली. रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्परच्या चालकाने मजुर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली. (sand dumped) त्यामुळे मजूर दबले गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
शुक्रवार, २१ फेब्रुवारीच्या रात्री सर्वांनी जेवण केले. त्यानंतर पाच जण पत्र्याच्या शेडमध्ये झोपी गेले. पुलाच्या कामासाठी शनिवारी पहाटेच्या सुमारास एक टिप्पर वाळू घेऊन आला. अंधारामध्ये टिप्पर चालकाने सगळी वाळू मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टाकली. त्यामुळे सर्व मजूर रेतीखाली दबले गेले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय ४०, गोळेगाव), भूषण गणेश धनवई (वय १६, गोळेगाव), सुनील समाधान सपकाळ (वय २०, पद्मावती), यांच्यासह अन्य दोन जणांचा मृत्यू झाला.
टिप्पर चालक रात्रीतून पसार झाला. घाईमध्ये रेती टाकत असताना चालकाने पत्र्याचे शेड असल्याचेही बघितले नाही. मजुरांसोबत एक १३ वर्षीय मुलगीही तिथे झोपलेली होती. आवाज झाल्याने आजूबाजूला राहणारे काही लोक धावून आले आणि त्यांनी मुलीला बाहेर काढत तिचा जीव वाचवला. (Jalna)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community